Saturday, July 27, 2024
Homeब्रेकिंगशेअरची किंमत 98 रुपये, रिलायन्सची गुंतवणूक असलेला 5G संबंधित कंपनीचा शेअर वेळीच...

शेअरची किंमत 98 रुपये, रिलायन्सची गुंतवणूक असलेला 5G संबंधित कंपनीचा शेअर वेळीच खरेदी करा

एचएफसीएल कंपनीचे शेअर्स शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये 8.52 टक्क्यांच्या वाढीसह 98.90 रुपये या आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 623 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.

 

एचएफसीएल कंपनीच्या स्टॉकची किंमत 100 रुपयेपेक्षा कमी असून आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी या कंपनीचे शेअर्स 98.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

 

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एचएफसीएल कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 92.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र काही वेळात हा स्टॉक 96.09 रुपये किमतीवर पोहोचला होता. एचएफसीएल कंपनी एकूण बाजार भांडवल 13,600 कोटी रुपये आहे. नुकताच या कंपनीला बीएसएनएल कंपनीने देखील एक मोठी ऑर्डर दिली आहे.

 

एचएफसीएल कंपनीला बीएसएनएल कंपनीने 623 कोटी रुपये मूल्याचे काम दिले आहे. एचएफसीएल कंपनीला या ऑर्डर अंतर्गत 5G नेटवर्कशी संबंधित नेटवर्किंग उपकरणे तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

1 जानेवारी रोजी एचएफसीएल कंपनीला बीएसएनएल कंपनीने 1127 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. एचएफसीएल कंपनी टेलिकॉम ऑपरेटर्ससाठी डिजिटल नेटवर्किंग संबंधित उपकरणेतयार करण्याचा व्यवसाय करते. मागील एका वर्षभरात एचएफसीएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 32 टक्के परतावा कमावून दिला आहे.

 

ज्या गुंतवणूकदारांनी सहा महिन्यांपूर्वी एचएफसीएल कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 45 टक्के वाढले आहे. मागील एका महिन्यात एचएफसीएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 27 टक्के परतावा कमावून दिला आहे.

 

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -