Saturday, November 9, 2024
Homeब्रेकिंगसोने झाले स्वस्त, तर चांदी झाली महाग; किंमतीतील अपडेट काय

सोने झाले स्वस्त, तर चांदी झाली महाग; किंमतीतील अपडेट काय

सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. जानेवारी महिन्यात सोने 2200 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी स्वस्त झाली. डिसेंबरच्या अखेरपासून आठवड्याच्या शेवटी किंमती वधारण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे.तो या आठवड्यात पण दिसून आला. सोने शंभर रुपयांनी स्वस्त झाले तर चांदी 1000 रुपयांनी महागली. बजेटपूर्वी सोने-चांदीत नरमाईचे सूर असले तरी बजेटनंतर किंमतीत किती वाढ होते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. काय आहेत आता सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 28 January 2024)

 

सोन्यात किंचित वाढ

 

या महिन्यात सोन्यात घसरणीचे सत्र होते. तर काही दिवस किंमतीत वाढ झाली. या महिन्यात सोने 2200 रुपयांनी उतरले. या आठवड्यात पण सोन्याच्या किंमतीत नरमाई होती. 24 आणि 25 जानेवारी रोजी 50 रुपयांची घसरण झाली. तर 26 जानेवारी रोजी सकाळी दरवाढ झाली तर संध्याकाळी किंमतीत 100 रुपयांची घसरण दिसली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

चांदीने गाठला मोठा पल्ला

 

जानेवारीत चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. या आठवड्यात पण चांदीत घसरण झाली. 23 जानेवारी रोजी 500 रुपयांची स्वस्ताई आली. तर 24 जानेवारी रोजी किंमतीत 300 रुपयांची वाढ झाली. 25 जानेवारी रोजी चांदीची किंमत 700 रुपयांनी वाढली. 26 जानेवारी रोजी किंमतीत बदल दिसला नाही. तीन दिवसांतएकूण 1000 रुपयांनी चांदी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये आहे.

 

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

 

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने उतरले तर चांदीच्या दरात वाढ झाली. 24 कॅरेट सोने 62,312 रुपये, 23 कॅरेट 62,062 रुपये, 22 कॅरेट सोने 57,078 रुपये झाले. 18 कॅरेट 46,734 रुपये, 14 कॅरेट सोने 36,453 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,299 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

 

BIS Care APP

 

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -