Tuesday, July 8, 2025
Homeब्रेकिंगकृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा; काय म्हणाल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण?

कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा; काय म्हणाल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण?

ताजी बातमी ऑनलाईन टीम 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतामरण यांनी गुरुवारी, 1 फेब्रुवारी 2024 रोजी नव्या संसदेमध्ये देशाचा 2024- 25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. आगामी निवडणुकांच्या धर्तीवर सादर झालेला हा अंतरिम अर्थसंकल्प असून, त्यामध्ये फार मोठ्या घोषणा अर्थ मंत्र्यांनी केल्या नसल्या तरीही हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याची बाब त्यांनी सुरुवातीपासूनच अधोरेखित केली.

महिला, गरीब, शेतकरी आणि देशातील युवा या घटकांना अर्थसंकल्पामध्ये विशेष स्थान दिलं गेल्याचं पाहायला मिळालं. सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमण यांनी सरकारच्या वतीनं कृषी क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या अनेक तरतुदी देशापुढे मांडल्या. यावेळी सरकारच्या वतीनं पिक कापणीनंतरच्या प्रक्रियेसाठी सार्वजनिक आणि वैयक्तिक गुंतवणुकीला आणखी वाव देईल असं सीतारमण यांनी जाहीर केलं.

सरकारच्या वतीनं 5 इंटीग्रेटेड एक्वा पार्कही सुरु करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राई, तीळ, शेंगदाणा यांसारख्या पिकांच्या उत्पादनाला सरकार आणखी प्राधान्य देणार असून, मत्स्य व्यवसायालाही प्रोत्साहन देणार असून या क्षेत्रांसाठी काम करणार आहे. कृषी क्षेत्रासाठी अद्ययावत तंत्रज्ञानानं परिपूर्ण असणाऱ्या मागणी, साठवण आणि पुरवठा या साखळीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -