Saturday, October 12, 2024
Homeक्रीडाटीम इंजियाचा 7 गडी राखून न्यूझीलंडवर दणदणीत विजय, मालिकाही जिंकली

टीम इंजियाचा 7 गडी राखून न्यूझीलंडवर दणदणीत विजय, मालिकाही जिंकली

ताजी बातमी ऑनलाइन टीम

दुसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs NZ 2nd T 20) टीम इंडियाने न्यूझीलंडवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियानं मालिकाही खिशात घातली. न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 154 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान टीम इंडियाने 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 153 धावा केल्या.

टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाकडून सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुलने (K L Rahul) अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. तर अखेरीस रिषभ पंतने एकाहीत सिक्स खेचत टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवलं. तत्पूर्वी, न्यूझीलंडकडून सलामीवीर जोडी मार्टिन गुप्टील आणि डेरेल मिचेलने प्रत्येकी 31 धावांची खेळी केली. तर ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 34 धावा केल्या.

टीम इंडियाकडून हर्षल पटेलने 2 गडी बाद करून चांगली कामगिरी केली. तर भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन आणि दीपक चाहर या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतला. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या सामन्याचे आयोजन माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचं होमग्राऊंड रांचीतील जेएससीए स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यांने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मालिकेच्या दृष्टीनं आजचा सामना निर्णायक आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची मोठी संधी आहे. तर न्यूझीलंडसाठी ‘करो या मरो’चा सामना आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघात काट्याची लढत पाहायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -