Saturday, September 7, 2024
Homeसांगलीसांगली : घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक, २८ लाखाचा ऐवज हस्तगत

सांगली : घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक, २८ लाखाचा ऐवज हस्तगत

सांगली- कोल्हापूर रस्त्यावरील समर्थ कॉलनीत गेल्या आठवड्यात झालेल्या घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी दोघांना अटक करुन २८ लाखाचा चोरीचा ऐवज हस्तगत केला असल्याचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी मंगळवारी सायंकाळी सांगितले.विनोद खत्री (वय ४४) कोल्हापूर रस्ता परिसरातील समर्थ कॉलनी येथे कुटुंबासमवेत राहतात. त्यांच्या मुलीचा विवाह असल्याने सोमवार दि. ६ रोजी दुपारी चारच्या सुमारास ते बंगल्याला कुलुप लावून कोल्हापूर येथे गेले होते. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ते घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.

त्यांनी याची माहिती तातडीने सांगली शहर पोलिसांना दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस पंकज पवार यांच्या पथकामधील अनिल ऐनापुरे यांना त्यांच्या बातमीदाराकडून, घरफोडी चोरी करून मिळालेले सोने विक्री करण्याकरीता दोन इसम अंकली फाटा येथे निळ्या रंगाचे मोपेड मोटर सायकलवर येवून थांबलेले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली. माहितीच्या आधारे संशयित राजु प्रकाश नागरगोजे (वय ३६, मुळ रा. सांवतगल्ली, उचगाव, ता. कोल्हापुर, जि.

कोल्हापुर. सध्या रा. बार्शी रोड, बाळे, ता. उत्तर सोलापुर, जि. सोलापुर) व नितेश आडवय्या चिकमठ (वय २९ वर्षे, रा. सावरकर कॉलनी, गल्ली नं. २, विश्रामबाग) यांना ताब्यात घेऊन झडती घेतली. नागरगोजे याच्या जवळ असलेल्या सॅकमध्ये चोरीतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळुन आली. त्यांच्याकडून २० लाखाची रोकड आणि ८ लाख ५९ हजाराचे दागिने याच्यासह गुन्ह्यात वापरलेली ८० हजाराची मोपेड हस्तगत करण्यात आली. नागरगोजे हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर सांगली, कोल्हापुर व कर्नाटक येथे घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -