इचलकरंजी : ताजी बातमी टीम
मराठा आरक्षण संदर्भात केवळ चालढकलपना केला जात आहे. या प्रश्नी १६ फेब्रुवारीपर्यंत निर्णय न झाल्यास १७ फेब्रुवारी रोजी इचलकरंजी बंद करण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त समजल्यानंतर व महाराष्ट्र बंदच्या पाश्र्वभूमीवर इचलकरंजीत पोलिस दलातर्फे शहरात ठिकठिकाणी बंदोबस्तात तैनात करण्यात आला होता.
नवरत्न कंपनी करणार मालामाल, 5.25 रुपये लाभांश देणार
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे-पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यांची प्रकृती खालावत चालल्याची बातमी समजताच मंगळवारी रात्री अचानकपणे बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.
पीएम सूर्य घर योजने’त मिळणार ३०० युनिट्सपर्यंत मोफत वीज
या पाश्र्वभूमीवर इचलकरंजीतील सकल मराठा समाजाची तातडीने छत्रपती शिवाजी उद्यान येथे बैठक घेण्यात आली. त्यामध्ये चर्वेत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीचा कायदा तातडीने करावा, ज्या त्रुटी राहिल्या आहेत त्या दूर कराव्यात, कुणबी, कुरवाडी, सगेसोयरे बाचा उल्लेख असलेला कायदा मंजूर करावा आदी मागण्या करण्यात आल्या,
प्रत्येक महिन्याला मिळवा 5000 रुपये पेन्शन, रोज जमा करा 7 रुपये केवळ
चर्वेअंती मनोज जरांगे- पाटील यांची प्रकृती खालावत चालल्याने राज्य सरकारने आरक्षण प्रश्नी गांभीर्याने विचार करावा. जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये, आरक्षण संदर्भात १६ पर्यंत निर्णय न घेतल्यास शनिवार १७ फेब्रुवारी रोजी इचलकरंजी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीस पुंडलिकभाऊ जाधव,संतोष सावंत, अरविंद माने, वैभव खोंद्रे, शहाजी भोसले, नितीन पाटील, अवधुत मुडशिंगीकन, सुरेश कापसे, विकास खोत, विजय मुतालिक, दिलीप पाटील, रामदास टिकले, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.