Thursday, November 21, 2024
HomeबिजनेसVirtual ATM : आता पैसे काढण्यासाठी ATM ची पण नाही गरज:डेबिट कार्डऐवजी...

Virtual ATM : आता पैसे काढण्यासाठी ATM ची पण नाही गरज:डेबिट कार्डऐवजी OTP ची पॉवर

Credit Card, Debit Card : आता छोटी रक्कम काढण्यासाठी तुम्हाला एटीएम मशीन शोधण्याची गरज नाही. त्यांना सोबत त्यांचे डेबिट वा क्रेडिट कार्ड बाळगण्याची पण गरज नाही. एका ओटीपी आधारे तुम्हाला रक्कम मिळू शकते. व्हर्च्युअल एटीएम तुमची पैशांची चणचण दूर करेल. विशेष म्हणजे त्यासाठी मोठी रक्कम काढण्याची गरज नाही. छोटी रक्कम तुम्हाला काढता येईल. सध्या युपीआयचे प्रचलन वाढले आहे.Credit Card, Debit Card 

Axis बँक पर्सनल लोन माहिती – व्याज दर, कागदपत्रे, पात्रता, चार्जेस, लोनचे प्रकार (Axis Personal Loan)

रेशन कार्ड बंद होणार, लगेच भरा ‘हा’ अर्ज

अगदी खेड्यात पण तुम्हाला युपीआय कोड सहज मिळून जाईल. पण युपीआयच्या वाढत चाललेल्या फसवणुकीमुळे अनेक जण पण रोख रक्कम स्वीकारण्यावर भर देत आहे. शहरातही असाच प्रकार पहायला मिळतो. अनेक दुकानदार रोखीत व्यवहार करतात. अशावेळी डेबिट कार्ड सोबत नसेल, रोख रक्कम नसेल तर अडचण होते. व्हर्च्युअल एटीएम काय आहे, त्याचा वापर कसा करता येईल, कुठे मिळेल ही रक्कम, जाणून घ्याया कंपनीचा उपाय…

राशिभविष्य : गुरुवार दि. 15 फेब्रुवारी 2024

पेमार्ट इंडियाने छोट्या रक्कमेबाबत मोठी भूमिका घेतली आहे. चंदीगड येथील या फिनटेक कंपनीने व्हर्च्युअल, कार्डलेस आणि हार्डवेअर-लेस कॅश विदड्रॉल सेवा सुरु केली आहे. या सेवेमुळे ग्राहकांना आता रोख रक्कम काढण्यासाठी एटीएम मशीन शोधण्याच्या भानगडीत पडायचे काम नसेल.

अर्धा तास आधी केंद्रावर पोहचले नाही तर १२ वीच्या विद्यार्थ्यांची होणार हकालपट्टी, हा आहे नवा नियम

आता आणखी होणार ऑनलाईन व्यवहार, OTP ची गरज पण नाही उरणार

तर त्याच्याकडे डेबिट कार्ड नसले तरी रोख रक्कम काढता येणार आहे. रोख रक्कम काढण्यासाठी ग्राहकांना पिन क्रमांकाची गरज नसेल. पण त्यांना एक ओटीपीची गरज असेल. पेमार्ट इंडिया प्रायव्हेट कंपनीचे संस्थापक आणि सीईओ अमित नारंग या सेवेला व्हर्च्युअल एटीएम असे म्हणतात. Virtual ATM

प्रत्येक महिन्याला मिळवा 5000 रुपये पेन्शन, रोज जमा करा 7 रुपये केवळ

कसा करता येईल व्हर्च्युअल एटीएमचा वापर Virtual ATM

  1. व्हर्च्युअल एटीएमच्या मदतीने पैसे काढण्यासाठी तुम्हाला केवळ एक स्मार्टफोन, मोबाईल बँकिंग एप mobile banking app आणि इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. त्यासाठी अगोदर बँकेच्या एपमध्ये रोख रक्कम काढण्यासाठी विनंती करावी लागेल. मोबाईल बँकिंग एपवर तुमचा बँकेत नोंद असलेला मोबाईल क्रमांक त्यासाठी वापरता येईल.
  2. तुम्हाला संबंधित जवळच्या दुकानदाराकडे छोटी रक्कम मागावी लागेल. लक्षात ठेवा ही सुविधा केवळ छोट्या रक्कमेसाठी आहे. मोठ्या रक्कमेसाठी ही सुविधा नसेल. छोट्या रक्कमेला पण काही मर्यादा असेल. संबंधित दुकानदार, टपरीधारकाकडे याविषयीचे यंत्र असेल. त्याआधारे हा व्यवहार पूर्ण होईल.
  3. त्यानंतर तुमचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँक एक ओटीपी क्रमांक पाठवेल. तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर हा ओटीपी पाठविण्यात येईल. पेमार्टच्या यादीतील जवळच्या दुकानदाराला हा ओटीपी क्रमांक तुम्हाला दाखवावा लागेल. तो तुम्हाला विनंती केलेली रक्कम रोखीत देईल.
RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -