Wednesday, September 27, 2023
Homeकोल्हापूरगॅरेजला आग; दुचाकीसह साहित्य खाक

गॅरेजला आग; दुचाकीसह साहित्य खाक

शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम परिसरातील दुचाकी गॅरेजला शुक्रवारी रात्री शार्टसर्किटमुळे आग लागली. यात गॅरेजमधील दुचाकी, वाहन दुरुस्तीचा रॅम्प यासह टायर्स, ऑईल, स्पेअर पार्टससह दुरुस्ती व्यवसायाचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.

गॅरेजला आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील वीजपुरवठा बंद करून आग विझविण्याचे काम सुरू झाले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात आली. आग लागल्याची बातमी शिवाजीपेठत वार्‍यासारखी पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे अग्निशमन विभागाच्या कार्यात अडथळे येत होते.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र