Friday, June 21, 2024
Homeकोल्हापूरएस.टी. कर्मचारी मागण्यांवर ठाम : कोल्हापूर जिल्ह्यातून विविध ग्रामपंचायतींचा पाठिंबा

एस.टी. कर्मचारी मागण्यांवर ठाम : कोल्हापूर जिल्ह्यातून विविध ग्रामपंचायतींचा पाठिंबा

ताजी बातमी /ऑनलाइन टीम

जिल्ह्यात गेल्या 12 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू आहे. निलंबित केलेल्या एसटी कर्मचार्‍यांनी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी सकाळी 11 वाजता पंचगंगा नदी पात्रात आंदोलनासाठी निघालेल्या कर्मचार्‍यांना पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक येथील आंदोलनस्थळीच ताब्यात घेऊन अटक केली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे. पोलिसांनी देखील आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी कर्मचार्‍यांनी केले.

आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट सुरू असताना एका महिला कर्मचार्‍यास भोवळ आली. त्यामुळे येथील वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले होते. दिवसभर आंदोलकांनी मध्यवर्ती बसस्थानक येथे ठिय्या मांडून शासनाचा तीव— शब्दांत निषेध केला. जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींनी एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनास पाठिंबा ठराव आणून दिले. निलंबित केलेल्या उत्तम पाटील, नामदेव रोडे, विनायक भोगम, कुबेर वासुदेव, रावन समुद्रे, हेमंत काशीद यांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली.

यावेळी बोलताना एसटी कर्मचारी उत्तम पाटील म्हणाले, कोल्हापुरात गेली 16 दिवस कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू आहे. राज्यातील एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर तोडगा निघालेला दिसत नाही. तत्काळ मार्ग निघावा, हिच कर्मचार्‍यांची भूमिका आहे. आज हा उद्रेक होत आहे हा कर्मचार्‍यांचा उद्रेक आहे. कर्मचारी संतापले असून यातून वाईट घडले तर याची सर्व जबाबदारी शासनाची राहील. शासनाने तोडगा काढून कर्मचार्‍यांना न्याय द्यावा, असे सांगितले

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -