Thursday, April 25, 2024
Homeराजकीय घडामोडीलोकसभा निवडणूक मार्चमध्ये? सात ते आठ टप्प्यात मतदान? मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली...

लोकसभा निवडणूक मार्चमध्ये? सात ते आठ टप्प्यात मतदान? मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यास सुरवात झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर लगेच राजकीय पक्षांना लोकसभा निवडणुकीसाठी व्यूहरचना आखावी लागणार आहे. देशभरात लोकसभा निवडणूक 2024 ची उत्कंठा वाढली आहे. सत्ताधारी भाजपपासून सर्वच पक्ष आणि विरोधी पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुक कधी जाहीर होणार याची राजकीय पक्ष वाट पाहता आहेत. मात्र, त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. तसे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Paytm ग्राहकांसाठी आनंदवार्ता! मिटली सर्व चिंता; ही बँक धावली मदतीला

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत असे महत्वाचे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक 2024 पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये जाहीर केली जाऊ शकते असे संकेत मिळत आहेत.

सरकारकडून मोफत पिठाची चक्की मिळवा! असा करा अर्ज (Flour Mill Yojana)

शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना निवडणुकीच्या तारखांबाबत विचारले असता ते म्हणाले, आम्ही तयार आहोत आणि सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाच्यावतीने मी सांगू इच्छितो की, आम्ही ओडिशाच्या सार्वत्रिक निवडणुका आणि विधानसभा निवडणुका घेण्यास तयार आहोत. निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे, असे ते म्हणाले.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या विधानामुळे निवडणूक आयोग मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा करू शकतो. प्राप्त माहितीनुसार एप्रिल आणि मे महिन्यात सात ते आठ टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. मे महिन्यातच निवडणुकीचे निकाल येऊ शकतात. 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपत आहे. त्यापूर्वीच नवी लोकसभा अस्तित्वात येणार आहे.

2014 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत 9 टप्प्यात मतदान झाले होते. तर, 2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 7 टप्प्यात मतदान झाले होते. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था, संसाधनांची उपलब्धता आणि इतर अनेक बाबी लक्षात घेऊन निवडणुका किती टप्प्यांत घ्यायच्या याचा निर्णय आयोगाला घ्यावा लागणार आहे.

भाजपला 370 जागा जिंकण्याचे आवाहन

2024 च्या लोकसभा निवडणुकीत मुख्य लढत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला 370 जागा आणि एनडीएला 400+ जागा जिंकण्याचे आवाहन केले आहे. भाजपने प्रचारात आधीच आघाडी घेतली आहे. तर, दुसरीकडे इंडिया आघाडीमधील घटकपक्ष कॉंग्रेसची साथ सोडून जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -