Monday, October 7, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापुरात 95 वर्षीय वृद्धेचा मृत्यू, कुटुंबातील सहा जणांवर मारहाणीचा आरोप

कोल्हापुरात 95 वर्षीय वृद्धेचा मृत्यू, कुटुंबातील सहा जणांवर मारहाणीचा आरोप

ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील श्रीमती हिराबाई गणपती नाईक (वय 95 वर्ष) या वृद्धेचा 12 जुलै 2021 रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणी नाईक कुटुंबातील सहा जणांनी संगनमत करुन, कट रचून आजीला मारहाण केल्याचा आरोप आहे.

रूकडी गावातील श्रीमती हिराबाई नाईक यांचा 12 जुलै 2021 रोजी मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी, 28 नोव्हेंबर 2020 रोजी हिराबाई यांना मुलगा महादेव, नातू दीपक, सुशील, सून अलका, नातसून लक्ष्मी यांनी मारहाण केल्याची तक्रार हातकणंगले पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानुसार त्यांच्यावर 439/2020 नुसार मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

मृत्यूवेळी वृद्धेच्या मान-डोक्यावर जखमेचे व्रण

11 जानेवारी 2021 रोजी हिराबाई यांचा मुलगा महादेव नाईक याने आईचा सांभाळ करण्याबाबत उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. प्रांतांच्या आदेशानंतर त्या 16 एप्रिल 2021 रोजी मुलाकडे राहण्यास गेल्या. दरम्यान 12 जुलै 2021 रोजी हिराबाई यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांच्या मान, डोक्यावर जखमेचे व्रण होते. तसेच त्यांच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. तो बंद करण्यासाठी कापसाचे बोळे नाकात घातले होते. जसजसे ते रक्ताने भिजतील तसतसे ते बदललेले होते.

याधीशांनी सांगितले, की हिराबाई यांचे निधन अनैसर्गिक पद्धतीने झाले आहे, असे दिसून येते. आरोपी आणि मयत यांच्यात फौजदारी खटले देखील प्रलंबित होते. आरोपी यांनी मयत महिलेला गंभीर दुखापत केल्याबाबत केस देखील प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत फिर्यादी करत असलेली मागणीही न्यायोचित आहे. महिलेच्या निधनाचे कारण समोर येणे देखील आवश्यक आहे. आरोपींच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजवरून देखील घटना कशी घडली, हे कळून येईल, असे सांगत हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असल्याचे मत न्यायाधीशांनी नोंदवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -