ताजी बातमी/ ऑनलाईन टीम
इचलकरंजी महानगरपालिका शहरातील गर्दीचे मुख्य ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणार आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने इचलकरंजी महापालिकेद्वारे हे मोठे पाऊल उचलले जात आहे.
याबाबतची घोषणा नुकताच इचलकरंजी महानगरपालिकेद्वारे करण्यात आली आहे. इचलकरंजी महानगरपालिकेचा नुकताच 625 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय अहवाल सादर करण्यात आला.
हा अहवाल 2024 25 या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आला आहे. यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओम प्रकाश दिवटे यांनी ही माहिती दिली.
यावेळी मुख्य लेखापरीक्षक विजय कोळपे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, तैमुर मुलानी नगरसचिव विजय राजापुरे, केतन गुजर यांचे सह पालिका अधिकारी उपस्थित होते.