ताजी बातमी/ ऑनलाईन टीम
इचलकरंजी शहरातील उपनगरांबरोबरच शहरातील प्रमुख मार्गांवर सर्वसामान्यांचे दळणवळण कमीत कमी खर्चात व्हावे, याचबरोबर वेळेची बचत व्हावी, तसेच याचा फायदा विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, छोटे मोठे व्यापारी तसेच महिला वर्गासाठी व्हावे यासाठी इचलकरंजी महानगरपालिका आता एक विशेष सेवा सुरू करत आहे.
ही विशेष सेवा म्हणजे इलेक्ट्रिक बस सेवा महापालिकेमार्फत सुरू करण्यात येणार आहे. इचलकरंजी शहरात काही वर्षांपूर्वी सिटी व सेवा कार्यरत होती. मात्र ही सेवा सध्या शहरात उपलब्ध नाही. शहरातील दळणवळण अधिक गतीने होऊन शहराबरोबरच परिसराचा विकास साधण्यास खूप मोठी मदत होणार आहे.
याबाबतची घोषणा नुकताच इचलकरंजी महानगरपालिकेद्वारे करण्यात आली आहे. इचलकरंजी महानगरपालिकेचा नुकताच 625 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय अहवाल सादर करण्यात आला यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओम प्रकाश दिवटे यांनी ही माहिती दिली.
यावेळी मुख्य लेखापरीक्षक विजय कोळपे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, तैमुर मुलानी नगरसचिव विजय राजापुरे, केतन गुजर यांचे सह पालिका अधिकारी उपस्थित होते.