Sunday, December 22, 2024
Homeराशी-भविष्य१८ वर्षांनंतर केतू- गुरुचा विनाशकारी ‘षडाष्टक योग’, ‘या’ राशीच्या लोकांवर कोसळणार संकट?

१८ वर्षांनंतर केतू- गुरुचा विनाशकारी ‘षडाष्टक योग’, ‘या’ राशीच्या लोकांवर कोसळणार संकट?

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, छाया ग्रह केतू ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. हा ग्रह एका राशीत सुमारे १७ महिने राहतो. अशा परिस्थितीत, पुन्हा त्याच राशीत परत येण्यासाठी त्याला सुमारे १८ वर्षे लागतात. गेल्या वर्षी म्हणजेच ३० ऑक्टोबर २०२३ रोजी केतूने कन्या राशीत प्रवेश केला होता. जिथे तो २०२५ पर्यंत राहणार आहे. अशा स्थितीत केतू कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा संयोग करेल, याने विविध राशींवर परिणाम होईल.

सध्या देवांचा गुरु मेष राशीत विराजमान आहे. अशा स्थितीत केतू आणि गुरु यांच्यामध्ये ‘षडाष्टक’ नावाचा अशुभ योग तयार होत आहे. १ मे रोजी गुरुचा वृषभ राशीत प्रवेश झाल्यानंतर हा योग संपेल. मेष राशीमध्ये तयार झालेला हा योग अनेक राशींच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो. परंतु, काही राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. षडाष्टक योग तयार झाल्यामुळे कोणत्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल जाणून घ्या….

 

मेष (Mesh Zodiac)

षडाष्टक योग तयार झाल्यामुळे मेष राशीच्या लोकांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. मेष राशीच्या लोकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तसेच त्यांना आरोग्याबाबतही थोडे सावध राहण्याची गरज आहे. कोणतेही जुने कर्ज फेडणे त्यांना शक्य होणार नाही, याबरोबर तुम्ही अनावश्यक खर्चामुळे त्रस्त राहू शकता. कर्ज खूप वाढू शकते. याशिवाय तुम्ही कोर्ट केसेसमध्ये अडकून राहू शकता. कुटुंबात काही ना काही कारणावरून मतभेद होऊ शकतात. अध्यात्माकडे काही प्रमाणात रस वाढू शकतो. केतूचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकणार नाही. अशा परिस्थितीत आरोग्याची पूर्ण काळजी घेण्याची गरज भासू शकते.

 

कर्क (Kark Zodiac)

षडाष्टक योग तयार झाल्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी १ मेपर्यंत सावध राहण्याची गरज आहे. भावंडांशी संबंध बिघडू शकतात. पण, यामागचे कारण तुम्हाला समजू शकत नाही. तुमच्या बोलण्याने नातेसंबंध बिघडू शकतात. तुम्ही यातून काही चांगलेही बोलला असाल, पण त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल. कुटुंबासोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. नोकरदार लोकांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे, कारण यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. शत्रूंपासून थोडे सावध राहण्याची गरज आहे.

 

धनु (Dhanu Zodiac)

धनु राशीच्या लोकांसाठी षडाष्टक योग थोडा कठीण असू शकतो. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. नोकरदार लोकांना आव्हाने, अडथळे आणि समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याबरोबरच तुम्हाला काम करावेसे वाटणार नाही, ज्यामुळे तुमच्या प्रगतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सरकारी कामातही कोणत्या ना कोणत्या मार्गाने अडथळे येण्याची शक्यता आहे. याशिवाय व्यवसायात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -