Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीनमो चषक रांगोळी स्पर्धेत निलेश वेटे गौरी गवते प्रथम

नमो चषक रांगोळी स्पर्धेत निलेश वेटे गौरी गवते प्रथम

शहर प्रतिनिधी/ महान कार्य वृत्तसेवा

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा इचलकरंजी आयोजित नमो चषक क्रीडा क्रिडा स्पर्धेअंतर्गत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेमध्ये निलेश वेटे, गौरी गवते प्रथम क्रमांकाचे चे विजेते ठरले. सदर स्पर्धेमध्ये विविध परिसरातून 160 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता

नमो चषक विविध क्रीडा सांस्कृतिक 2024 अंतर्गत रांगोळी स्पर्धा घेण्यात आली . या स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह खुल्या वर्गातील स्पर्धेमध्ये १६० स्पर्धकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता.स्पर्धकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विकसित भारत, आत्मनिर्भर भारत, चंद्रयान, स्वर्गीय माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम ,‘बेटी बचाव बेटी, पढाओ’, स्त्री भ्रूण हत्या, स्वच्छ भारत अभियान, जलसंवर्धन, निसर्गचित्र या समाजजागृती करणाऱ्या विषयांवर रांगोळी रेखाटन केले.

सदर स्पर्धेमध्ये शालेय गट प्रथम क्रमांक गौरी गवते,द्वितीय क्र. समृद्धी जाधव, तृतीय क्र.वैभवी पाटील .खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांक निलेश वेटे, द्वितीय क्र. सोमनाथ जाधव, तृतीय क्र. माया पसारे यांनी यश संपादन केले. विजेत्यांना सुमनताई खाडे,निलीमाताई दिवटे, रुपाताई बुगड, भाग्यश्री वाळवेकर, यांच्या हस्ते शिल्ड व रोख बक्षीसे देण्यात आली.यावेळी दिव्यांग विद्यार्थिनी श्रुती लाटकर हीचा विशेष सत्कार करण्यात आला .

यावेळी युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड, महिला आघाडी अध्यक्षा अश्विनी कुबडगे, नीता भोसले,सुप्रिया मजले,योगिता दाभोळे, शबाना शहा, ज्योती लाटणे,आरती कडाले उमाकांत दाभोळे उपस्थित होते .सुत्र संचालन हेमंत वरुटे यांनी केले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -