Sunday, December 22, 2024
Homeसांगलीआग विझवण्याच्या प्रयत्नात शेतकऱ्यांचा भाजून मृत्यू

आग विझवण्याच्या प्रयत्नात शेतकऱ्यांचा भाजून मृत्यू

शेतात लागलेली आग विझवताना भाजून शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. रावसाहेब बाळू चौंडाज (वय 75) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रावसाहेब चोंडाज हे काल, गुरुवारी (दि.२९) सकाळी शेतात गेले होते. शेतातील पालापाचोळा, गवत एकत्रित करून पेटवले. यावेळी वाऱ्याने आग शेजारील शेतकरी अभिजित चौंडाज यांचे ऊस तोडलेल्या पालापाचोळ्यास लागली. ती आग विझवण्याचा प्रयत्न करीत असताना त्यामध्ये रावसाहेब चौंडाज यांचा भाजून गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -