Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनचार वर्षानंतर अजय देवगण 'मैदान' मारण्यास सज्ज; जाहीर केली रिलीज डेट

चार वर्षानंतर अजय देवगण ‘मैदान’ मारण्यास सज्ज; जाहीर केली रिलीज डेट

जवळपास चार वर्षांपासून रखडलेल्या ‘मैदान’ (Maidaan Movie) चित्रपटाला मुहूर्त सापडला आहे. अजय देवगणची (Ajay Devgan) या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. भारतीय फुटबॉल संघाच्या (Indian Football Team) सोनेरी इतिहासावर या चित्रपटाची कथा बेतली आहे. टीम इंडियाच्या फुटबॉल संघाचे कोच आणि मॅनेजर राहिलेले सय्यद अब्दुल रहमान यांच्या जीवनपटावर या चित्रपटाची कथा बेतली आहे.

अजय देवगणने आज त्याच्या आगामी ‘मैदान’ चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज केले. फुटबॉलच्या इतिहासावर अमिट छाप सोडणारी एक व्यक्ती, एक संघ, एक देश आणि त्यांच्या अतूट विश्वासाच्या विलक्षण प्रवासाचे साक्षीदार व्हा अशी कॅप्शन अजय देवगणने दिली आहे. अजय देवगणने या चित्रपटाचा ट्रेलर 7 मार्च रोजी प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले आहे.

फुटबॉल कोचवर आधारीत आहे चित्रपट
या चित्रपटात अजय देवगण भारतीय फुटबॉलचे संस्थापक मानले जाणारे फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहमान यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सय्यद अब्दुल रहमान यांनी 1950 ते 1963 पर्यंत भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून काम केले. ‘मैदान’मध्ये अजय देवगणशिवाय प्रियमणी आणि गजराज राव हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट बोनी कपूर आणि झी स्टुडिओच्या बॅनरखाली प्रदर्शित होणार आहे.

चार वर्षांपासून रखडला होता चित्रपट
वृत्तांनुसार, मैदान चित्रपटाची घोषणा 2018 मध्ये करण्यात आली होती. 2019 मध्ये हा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकणार अशी अपेक्षा होती. मात्र, या चित्रपटाचे प्रदर्शन लांबले. त्यानंतर 2023 मध्ये ‘मैदान’ चित्रपट रिलीज करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी त्याचा टीझरही लाँच करण्यात आला होता. मात्र, काही कारणास्तव पुन्हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर आता हा चित्रपट रिलीज होणार आहे.

कधी होणार रिलीज मैदान?
मैदान चित्रपट हा ईदच्या दिवशी अर्थात पुढील महिन्यात चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अजय देवगणच्या या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार याकडे सिनेसृष्टीचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -