Wednesday, May 15, 2024
Homeबिजनेसविमा की Mutual Fund? कोणता सर्वात उत्तम, दोघात काय अंतर, घेता येतो...

विमा की Mutual Fund? कोणता सर्वात उत्तम, दोघात काय अंतर, घेता येतो का एकत्रित फायदा

विमा की Mutual Fund? कोणता सर्वात उत्तम, दोघात काय अंतर, घेता येतो का एकत्रित फायद

Insurance-Mutual Fund | आजच्या महागाईच्या युगात विमा की म्युच्युअल फंड असा सवाल अनेकांच्या मनात घोळतो. विमा एजंट अनेक प्रकारचे दावे करतात. आरोग्य आणि जीवन विम्याचे मोठे फायदे होतात. तर म्युच्युअल फंडचा परतावा पण खुणावत असतो. तर फायद्याचे गणित काय? दोघांचा फायदा होईल असा एकत्रित मार्ग आहे काय?

नवी दिल्ली | 5 March 2024 : विमा आणि म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही तुमच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आहेत. त्याचे उद्दिष्ट वेगवेगळी आहेत. पण अनेकदा विमा घ्यावा की म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी, अशी द्विधा मनःस्थिती होते. कोणता पर्याय निवडा आणि कुठे गुंतवणूक वाढावी याविषयी मन साशंक असते. जर दोघांमध्ये गुंतवणूक करायची प्राथमिकता कोणाला द्यावी, असा प्रश्न येतोच. तर काहींना या दोघांचा एकत्रित फायदा घेता येईल का, असा पण विचार असतो.

विम्याचे फायदे काय?

विमा व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षा देते. उत्पनातील अनियमितता, रोजगार नसणे, नोकरी जाणे, विमा वा इतर संकटाच्या काळात विम्यामुळे सुरक्षा मिळते.

जीवन विमा योजना व्यक्तीच्या, विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देतात. त्यामुळे गरजेच्यावेळी त्याच्या कुटुंबाला विम्याचा मोठा आधार मिळतो.

आरोग्य विमा, आरोग्याच्या तक्रारी, मोठे आजारपण, अपघात, दुखापत यामध्ये आर्थिक मदत देतो. उपचाराचा खर्च यामुळे मिळतो. कुटुंबावर अचानक आर्थिक भार येत नाही. आर्थिक खड्डा आरोग्य विम्यामुळे पडत नाही.

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत तुम्ही बाजारातील जोखीम स्वीकारता. पण त्यातून तुम्हाला जोरदार परतावा मिळतो. अर्थात प्रत्येक वेळा असे होईलच असे नाही. पण परंपरागत गुंतवणुकीपेक्षा अधिक परतावा मिळतो.

म्युच्युअल फंडातून पैसे काढणे सोपे असते. तुमच्या गरजेनुसार फंड मॅनेज करण्यात त्याची मदत होते.

तुम्ही म्युच्युअल फंडाची निवड तुमचे उद्दिष्ट्ये आणि गरजेनुसार करु शकता. तुम्ही ही गुंतवणूक दीर्घ अथवा अल्प कालावधी करु शकता. विविध क्षेत्रातील म्युच्युअल फंडात ही गुंतवणूक करता येते.

जास्त जोखीम नको असेल तर गुंतवणूकदाराला बॅलेन्स्ड फंड फायदेशीर ठरतो. तुमच्या गुंतवणूक तज्ज्ञांच्या मदतीने तुमच्यासाठी योग्य फंडाची निवड करता येऊ शकते.

एकत्रित पर्याय काय?

अनेक जण भविष्य सुरक्षित करण्यासोबतच गुंतवणुकीतून फायद्याचे गणित पण आजमावू पाहतात. त्यांना विमा आणि म्युच्युअल फंडाचा एकत्रित लाभ हवा असतो. त्यांच्यासाठी विमा कंपन्यांची युलिप (ULIPs) योजना आहे. तर काही म्युच्युअल फंड विम्यासह SIP चा पर्याय देतात. हे म्युच्युअल फंड हायब्रीड श्रेणीत मोडतात. त्यांना विमा म्युच्युअल फंड अथवा विम्यासहीत म्युच्युअल फंड असे नाव असते. त्यातही ग्राहकांना परतावा, विमा संरक्षण आणि कर बचत करता येते. अर्थात याविषयी गुंतवणूक सल्लागाराची मदत आवश्य घ्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -