Wednesday, September 27, 2023
Homeसांगलीमहाविद्यालयीन तरुणावर अनैसर्गिक अत्याचार सांगलीत पोलिसावर गुन्हा

महाविद्यालयीन तरुणावर अनैसर्गिक अत्याचार सांगलीत पोलिसावर गुन्हा

ताजी बातमी ऑनलाइन टीम

महाविद्यालयीन युवकासोबत अनैसर्गिक संबंध ठेवत, त्याची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी वसूल केल्याची धक्कादायक घटना सांगलीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्याचा हवालदार हणमंत कृष्णा देवकर याच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

7 ऑक्टोबरला पहाटे तीन वाजताच्या सुमारास हणमंत देवकर आणि एक कर्मचारी इस्लामपूर येथील एका रस्त्यावर पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एक महाविद्यालयीन युवक आपल्या मैत्रिणीला भेटून पुन्हा वसतिगृहात जात होता. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला अडवले.

‘आता कोठून आलास? इथे काय करतोयस?’ अशी त्याच्याकडे विचारणा केली. संबंधित युवकाने मी मैत्रिणीला भेटून येत आहे असे सांगितले. पोलिसांनी त्या युवकाकडून त्याचा फोन नंबर घेतला. 29 ऑक्टोबरला महाविद्यालयाच्या गेटजवळ येत हणमंत देवकर याने त्या युवकाला फोन करुन भेटायला येण्यास सांगितले.

सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास संबंधित युवक पोलिसांना भेटला. त्याच्याकडे पैशाची मागणी करत पैसे न दिल्यास प्रेम प्रकरण त्याच्या आणि मैत्रिणीच्या घरी सांगेन अशी धमकी दिली. त्यावर युवकाने आपल्या मित्रांच्या कडून चार हजार रुपये उसने घेऊन हणमंत देवकर याला दिले.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र