Sunday, November 3, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : कमी किमतीत सोने देण्याच्या आमिषाने दीड कोटींचा गंडा

कोल्हापूर : कमी किमतीत सोने देण्याच्या आमिषाने दीड कोटींचा गंडा

ताजी बातमी ऑनलाइन टीम

हालोंडी व हेरलेसह परिसरातील लोकांना कमी किमतीत सोने देतो, असे सांगून 15 जणांना दीड कोटी रुपयांना गंडा घालणार्‍या हालोंडी (ता. हातकणंगले) येथील दत्तात्रय मारुती जामदार ऊर्फ डीजे याला शिरोली एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी त्याच्या सासरवाडीतून अटक केली. याबाबत हालोंडीतील दोघांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.

डीजेने एका खासगी सावकाराकडून पैसे घेऊन औद्योगिक वसाहतीमध्ये छोटा व्यवसाय सुरू केला. यातून तो एका बँक अधिकार्‍याच्या संपर्कात आला. या ओळखीतून त्याला बँक लिलावातील सोने  कमी किमतीत मिळाले. हेच सोने त्याने संबंधित खासगी सावकाराला दिले. यातून काहींनी स्वतःहून त्याच्याकडे रक्कम देत पुढच्या लिलावातील सोने आम्हाला दे, असे सांगितले. याचा गैरफायदा घेत डीजेने गुंतवणूकदारांना गंडा घालण्यास सुरुवात केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -