Wednesday, July 30, 2025
Homeमहाराष्ट्रआमचा मुलगा निर्दोष’ म्हणत आई वडिलांचा फुटला अश्रूंचा बांध, मुलावर गंभीर आरोप,...

आमचा मुलगा निर्दोष’ म्हणत आई वडिलांचा फुटला अश्रूंचा बांध, मुलावर गंभीर आरोप, एल्विश यादव प्रकरणात थेट..

एल्विश यादव हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. एल्विश यादव याच्यावर गंभीर आरोप हे करण्यात आलेत. हेच नाही तर एल्विश यादव याला पोलिसांनी अटकही केली आहे. एल्विश यादवचे रेव्ह पार्टी प्रकरणात पाय खोलात असल्याचे बघायला मिळतंय. एल्विश यादव याच्याकडून गांजा देखील जप्त करण्यात आल्याचे सांगितले जाते. 14 दिवस न्यायालयीन कोठडीमध्ये एल्विश यादव हा असणार आहे. यावेळी एल्विश यादव याच्याकडून काही मोठे खुलासे करण्यात आल्याचे देखील सांगितले जातंय. एल्विश यादव याने मान्य केले की, त्याने रेव्ह पार्टीचे आयोजन केले.

एल्विश यादवचे वडील म्हणाले की, हे चुकीचे आहे एल्विशने कोणतेच आरोप मान्य केले नाहीत. चुकीच्या गोष्टी या पसरवल्या जात आहेत. पुढे एल्विश यादवचे वडील म्हणाले की, मी एक शिक्षक आहे आणि मी माझ्या मुलाला खूप जास्त चांगले संस्कार हे दिले आहेत. माझ्या मुलाने कोणते आरोप मान्य केले त्याचा काही व्हिडीओ वगैरे आहे का? चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत.

 

मेनका गांधी यांच्यावर देखील एल्विश यादवचे आई वडिलांनी गंभीर आरोप हे केले आहेत. एल्विश यादव याची आई म्हणाली की, आमचा मुलगा प्रसिद्ध होत असल्याने त्याच्यावर असे आरोप केले जात आहेत. मेडिकलनंतर त्याला अटक करण्यात आल्याचे देखील सांगितले जाते. आता या प्रकरणात अजून काही मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -