08 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्ही SIR म्हणजेच Special Intensive Revision अंतर्गत नोंदणी केली नाही, तर काही प्रकरणांमध्ये तुमच्या मतदार यादीतील नोंदीवर परिणाम होऊ शकतो. आपण मोबाईलवरून SIR चा ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा, तो अगदी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत.
कोणतं ॲप डाउनलोड करायचं? कोणते कागद लागतात? चार पर्यायांपैकी नेमका कोणता निवडायचा? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ऑनलाइन फॉर्म भरताना कोणती चूक केली तर अर्ज पुढेच जात नाही? म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रक्रिया मोबाईलवरून स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा
पण एक गोष्ट आधीच लक्षात ठेवा…
जर ऑनलाइन फॉर्म भरताना कोणतीही तांत्रिक अडचण आली, नाव जुळत नसेल किंवा OTP संबंधित समस्या येत असतील, तर वेळ वाया घालवू नका. थेट तुमच्या BLOशी संपर्क साधा आणि ऑफलाइन फॉर्म जमा करा.
चला, आता सुरुवात करूया…
Step 1 : ECINet App डाउनलोड करा
सर्वात आधी तुमच्या मोबाईलमधील Google Play Store उघडा. Search मध्ये टाइप करा… ECINet …हे भारताच्या Election Commission of India चे अधिकृत ॲप आहे. हे ॲप डाउनलोड करून Install करा. Install झाल्यानंतर App Open करा. पहिल्यांदा Permission मागितली तर Allow करा.
Step 2 : 2002 च्या SIR यादीमध्ये नाव शोधा
App उघडल्यानंतर अनेक पर्याय दिसतील. यामध्ये… Search Your Name in Last SIR… या पर्यायावर क्लिक करा. आता इथे…
राज्य निवडा
जिल्हा निवडा
मतदारसंघ निवडा
यानंतर… सर्वात आधी तुमचं नाव Search करा. जर तुमचं नाव नसेल… तर… वडिलांचं नाव, आईचं नाव, आजोबांचं नाव, आजीचं नाव, यापैकी कोणाचंही नाव Search करा. जर नाव सापडलं… तर त्याचा स्क्रीनशॉट नक्की काढून ठेवा. कारण पुढे फॉर्म भरताना त्याची गरज लागणार आहे.
Step 3 : Voter Registration Forms
मध्ये जा, आता Home Screen वर या. Voter Registration Forms यावर क्लिक करा. यानंतर…”स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन – फिल इन्यूमरेशन फॉर्म ऑनलाइन हा पहिला पर्याय निवडा.
Step 4 : Login किंवा Registration…
जर आधीपासून Account असेल… तर Mobile Number टाका. OTP घ्या. Login करा. जर Account नसेल… तर…New User यावर क्लिक करा. मोबाईल नंबर टाका, OTP Verify करा, नाव भरा, Registration पूर्ण करा यानंतर पुन्हा Voter Registration Forms मध्ये या.
Step 5 : मतदार माहिती शोधा
State मध्ये Maharashtra निवडा. आता तुमचा EPIC Number म्हणजेच मतदान कार्डवरील नंबर टाका. Search करा. तुमची माहिती स्क्रीनवर दिसेल. ती व्यवस्थित तपासा.
Step 6 : दोन महत्त्वाच्या अटी
आता इथे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली अट आधार कार्डवरील English Name आणि मतदान कार्डवरील English Name दोन्ही अक्षरशः एकसारखे असले पाहिजेत. जर Spellings वेगळ्या असतील…तर Online Form भरता येणार नाही. अशा वेळी BLO कडे जाऊन Offline प्रक्रिया करावी लागेल.
दुसरी अट
तुमच्या मतदान कार्डला Mobile Number लिंक असणे आवश्यक आहे. जर Mobile Number लिंक नसेल… तर आधी तो अपडेट करा.
Step 7 : Mobile Number Link
त्यासाठी दिलेल्या Link वर क्लिक करा. State निवडा. EPIC Number टाका. Proceed करा. रेकॉर्ड दिसल्यानंतर… Next करत जा. Correction of Entries हा पर्याय निवडा. यानंतर Mobile Number Update चा पर्याय निवडा. तुमचा मोबाईल नंबर टाका. OTP Verify करा. Submit करा. काही मिनिटांत Mobile Number Link होईल.
Step 8 : पुन्हा SIR Form सुरू करा
आता पुन्हा… Voter Registration Forms मध्ये जा. Special Intensive Revision Form उघडा. State निवडा. EPIC Number टाका. OTP Verify करा. आता तुमच्यासमोर चार पर्याय दिसतील.
Step 9 : योग्य पर्याय निवडा
पर्याय 1 – जर 2002 च्या SIR यादीमध्ये तुमचंच नाव असेल… तर पहिला पर्याय निवडा.
पर्याय 2 – जर तुमचं नाव नसेल…पण… आई…वडील…आजी…आजोबा… यापैकी कोणाचं नाव 2002 च्या SIR यादीमध्ये असेल… तर दुसरा पर्याय निवडा.
पर्याय 3 – जर 2002 मध्ये नाव नसेल… पण घरातील कोणाचं नाव सध्याच्या मतदार यादीमध्ये असेल… तर तिसरा पर्याय निवडा.
पर्याय 4 – जर वरच्या तिन्ही पर्यायांमध्ये तुम्ही बसत नसाल… तर चौथा पर्याय निवडा. आणि स्वतःची माहिती भरून पुढे जा.
Step 10 : Relative Details भरा उदाहरणार्थ… जर आजोबांचं नाव वापरत असाल… तर… State, मतदारसंघ, Polling Station, Relationship, Part Number, Serial Number, ही माहिती भरा. Search करा. नाव Match झालं की… Continue वर क्लिक करा.
Step 11 : Personal Information
आता स्वतःची माहिती भरा., जन्मतारीख, आधार क्रमांक (ऐच्छिक), वडिलांचं नाव, वडिलांचा EPIC Number, आईचं नाव, आईचा EPIC Number, लग्न झालं असेल तर… पत्नीचं नाव आणि EPIC Number भरा. Place म्हणजे गावाचं नाव लिहा.
Step 12 : Photo Upload
आता तुमचा नवीन Passport Size Photo Upload करा. JPG Format वापरा. Photo Upload झाल्यानंतर… Submit वर क्लिक करा.
Step 13 : Final Verification
Submit करण्यापूर्वी… संपूर्ण फॉर्म पुन्हा एकदा तपासा. सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा. यानंतर Declaration Tick करा. Submit करा.
Step 14 : Aadhaar e-Sign
शेवटी Aadhaar Number विचारला जाईल., OTP Verify करा. e-Sign पूर्ण करा. सर्व माहिती योग्य असल्यास फॉर्म यशस्वीरित्या Submit होईल.
Step 15 : Reference ID जतन करा
Form Submit झाल्यानंतर… Reference ID दिसेल. त्याचा Screenshot काढून ठेवा. शक्य असल्यास हा Screenshot तुमच्या BLO ला WhatsApp वर पाठवा.
Step 16 : Status Check
नंतर पुन्हा त्याच Form मध्ये जाऊन EPIC Number टाकल्यास… तुमचा फॉर्म Submitted असल्याचे दिसेल. याचा अर्थ तुमचा ऑनलाइन अर्ज यशस्वीरित्या जमा झाला आहे.
तर, अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून SIR चा ऑनलाइन फॉर्म भरू शकता. पुन्हा एकदा सांगतो… जर नाव जुळत नसेल, OTP ची अडचण येत असेल किंवा ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण होत नसेल… तर वेळ न घालवता तुमच्या BLO शी संपर्क साधा आणि ऑफलाइन अर्ज भरा.


