Sunday, December 22, 2024
Homeसांगलीसांगलीच्या महापुराचा विळखा सैल होणार?

सांगलीच्या महापुराचा विळखा सैल होणार?

ताजी बातमी/ऑनलाइन टीम

सांगलीच्या महापुराच विळखा आता सैल होणार का अशा काहीशा भावना येथील पुर ग्रातांमधून निर्माण होऊ लागले आहेत. सांगली मधील महापूर ओसरण्याची चिन्हे आहेत. पुराचा विळाखा थोडसा सैल होण्याची शक्यता आहे. परिसर व जिल्ह्यात पावसाने शनिवारी काहीशी उसंत घेतली आहे. त्यामुळे कोयना, धोम, कण्हेर, चांदोली धरणांतील पाण्याच्या विसर्ग कमी करण्यात आला आहे.

कर्नाटकातील अलमट्टी धरणातून साडेतीन लाख क्युसेकपेक्षा जादा पाणी सोडले जात आहे. परिणामी सांगलीसह शिराळा, वाळवा, पलूस, मिरज, कडेगाव तालुक्यांतील नदीकाठच्या महापुराची मगरमिठी रविवारी सैल होईल, अशी आशा वाटू लागली आहे.

अद्यापही हजारो लोक पशुधनांसह बाहेरच आहेत. 74 पेक्षा अधिक रस्ते पाण्याखाली आहेत.लाखो लिटरचे दूध संकलन ठप्प आहे. पूरग्रस्तांना मदतकार्य वेगात सुरू आहे.

बुधवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गुरुवारी कृष्णा, वारणा नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढले. शुक्रवारी पाणी दोन्ही नद्यांच्या पात्राबाहेर पडले. यामुळे शनिवारी सांगली शहरासह जिल्ह्यातील नदीकाठाला महापुराचा विळखा पडला.

शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यांतील अनेक गावे बुडाली. अनेक गावे, वाड्या-वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. पिकांसह शेकडो रस्ते पाण्याखाली आहेत. पुराच्या वेढ्यात अडकण्याच्या भीतीने शुक्रवारी हजारो लोकांनी पशुधनांसह स्थलांतर केले आहे.

अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे पथक, महसूल, पोलिस प्रयत्न करीत आहेत. मागील पुराचा अनुभव भीतीदायक असल्याने यावेळी लोकांनी स्वत:च स्थलांतर केल्याने बचावकार्य फारसे करावे लागले नाही. सांगलीतील दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, बायपास परिसर, दत्त-मारुती रोड, तरुण भारत स्टेडियम, राजवाडा चौक, शिवाजी मंडई, कोल्हापूर रोड, पत्रकारनगर, गणपती पेठ, कर्नाळ नाका, शामरावनगर, हरिपूर रस्ता, शंभरफुटी रोड, खिलारे मंगल कार्यालय या परिसरात पाणी घुसले आहे.

दरम्यान, धरण परिसरातील दोन दिवस सुरू असणारा जोरदार पाऊस आज काहीसा ओसरला होता. जिल्ह्यात शिराळा तालुका वगळता सरासरी 53.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत मिरज तालुक्यात 57.5, जत तालुक्यात 1.8, खानापूर-विटा तालुक्यात 32.9, वाळवा-इस्लामपूर तालुक्यात 140.9, तासगाव तालुक्यात 27, आटपाडी तालुक्यात 4.8, कवठेमहांकाळ तालुक्यात 14.2, पलूस तालुक्यात 59.1, कडेगाव तालुक्यात 52.8 मि.मी. पाऊस पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -