Thursday, April 25, 2024
Homeराजकीय घडामोडीटाटाचे शेअर खरेदी करुन तो गेला परदेशात, परत आला तर डीमॅट खात्यात...

टाटाचे शेअर खरेदी करुन तो गेला परदेशात, परत आला तर डीमॅट खात्यात जमा झाले इतके लाख

पाटण्यातील डॉक्टर विजय सिन्हा यांचा हा किस्सा तुम्हाला अंचबित केल्याशिवाय राहणार नाही. मंडळी आपण अनेकदा काही गोष्टी करतो. विसरुन जातो. पण नंतर असा काही चमत्कार होतो की नशीब चकमते. तर डॉक्टर सिन्हा तसा कोट्याधीश माणूस. त्यांना अजून एक खजिना नुकताच मिळाला आहे.

तर ही कथा सुरु होते, 1990 मध्ये डॉक्टर साहेबांनी नुकतीच डॉक्टरकीसोबत शेअर बाजाराची एबीसीडी गिरवली होती. त्यांनी टाटा समूहातील या कंपनीचे तेव्हा 100 शेअर खरेदी केले होते. ते परदेशात स्थायिक झाले आणि ही गुंतवणूक ते विसरले. पण आता त्यांना शेअर समाधान या फर्मने हा खजिना परत मिळवून दिला आहे. ते लखपती झाले आहेत.1990 मध्ये केली होती गुंतवणूक

विजया सिन्हा हे पाटण्यातील रहिवाशी, त्यांनी 1990 मध्ये शेअर बाजारातील काही स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली होती. त्यांनी त्यावेळी टायटन कंपनीचे 100 शेअर खरेदी केले. ही गुंतवणूक केल्यानंतर त्यांना अचानक परदेशात जाण्याची संधी मिळाली. ते इंग्लंडला रवाना झाले. तिथेच ते डॉक्टरकीच्या पेशात रमले. कित्येक दशक त्यांना काही परत भारतात येता आले नाही. आर्थिकदृष्ट्या ते संपन्न झाले. टायटन कंपनीत केलेली ही गुंतवणूक ते विसरले.100 शेअर्सनी केले लखपती

टाईम्सनाऊच्या वृत्तानुसार, 1990 मध्ये टायटन कंपनीत त्यांनी गुंतवणूक केली. 100 शेअर खरेदी केले. त्यानंतर टायटनने भरारी घेतली. कंपनीने अनेकदा बोनस दिला. स्टॉक स्प्लिट झाला. त्यामुळे या 100 शेअरचे 2000 शेअर झाले. आता या शेअरची किंमत 73 लाख रुपये झाली आहे. सध्या टायटनच्या एका शेअरची किंमत 3700 रुपये झाली आहे.

या संस्थेमुळे मिळाले ‘धन’

शेअर समाधान या रिट्राईवल एडव्हायझरी फर्मने डॉक्टरांना त्यांचा हरवलेला खजिना परत मिळवून दिला. जे गुंतवणूकदार त्यांची गुंतवणूक विसरतात. दावा न केलेले फंड, योग्य व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचे काम ही फर्म करते. या संस्थेचे सहसंस्थापक आणि संचालक विकास जैन यांनी या सर्व घटनाक्रमावर प्रकाश टाकला. डॉक्टर सिन्हा यांच्याशी संपर्क करणे सर्वात कठिण काम होते, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली. देशातील आणि इंग्लंडमधील अनेकांशी संपर्क केला. शेवटी यश आले, डॉक्टरांचा मोबाईल क्रमांक मिळाला.

डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का

विकास जैन यांनी डॉक्टर सिन्हा यांच्याशी संपर्क केल्यावर टायटन कंपनीच्या 100 शेअरची आठवण करुन दिली. त्याची सध्याची किंमत सांगितली. त्यावेळी डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. पण या शेअरवर दाव करणे सोपे काम नव्हते. एकतर त्यावेळी त्यांनी घेतलेले शेअर खरेदीची कागदपत्रे त्यांनी हरवली होती. तसेच ओळख पटविणे हा पण जिकीराचा मुद्दा होता. पण सर्वच संकटांवर मात करत अखेर हा खजिना डॉ. सिन्हा यांच्यात डिमॅट खात्यात जमा झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -