आतापर्यंत तासगाव तालुक्यात शांततेत सुरु असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास सोमवारी सायंकाळी हिंसक वळण लागले. विटा आगाराच्या विटा – सांगली बसवर सोमवारी सायंकाळी कवठेएकंद गावाच्या हद्दीत अज्ञातांनी दगडफेक केली आहे. यामध्ये बसचा चालक किरकोळ जखमी झाला.
सोमवारी सायंकाळी विटा आगाराची विटा-सांगली (एमएच 20 डी 9152) ही बस पोलीस बंदोबस्तात संगलीकडे निघाली होती. या बसवर कवठेएकंदजवळ अज्ञातांनी दगडफेक केली. बसची पुढील बाजूची व खिडकीची काच फुटली आहे. या दगडफेकीत बसचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्यामुळे तासगाव तालुक्यात एस. टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास हिंसक वळण लागले आहे.