Thursday, March 13, 2025
Homeकोल्हापूरआणखी एका बड्या व्यावसायिकाला दीड कोटीला लुटले!

आणखी एका बड्या व्यावसायिकाला दीड कोटीला लुटले!

एकापाठोपाठ एक उघडकीस येणार्‍या हनी ट्रॅपच्या प्रकारांनी कोल्हापूर जिल्हा ढवळून काढला आहे. यात आणखी एका 52 वर्षीय व्यावसायिकाच्या हनी ट्रॅपची भर पडली आहे. चौघा सराईत गुन्हेगारांनी व्यावसायिकाला दीड कोटीला लुटल्याची चर्चा आहे. अश्लील चित्रफीत व्हायरलची धमकी देऊन वारंवार खंडणी वसुली सुरू असल्याने व्यावसायिकांसह कुटुंबीयही हैराण झाले आहे.

हनी ट्रॅप’मध्ये गुंतवून कापड व्यापार्‍याला लुटल्याची घटना उघडकीला आल्याने आणि पोलिसांनी युवतीसह सात संशयितांना बेड्या ठोकल्याने व्यावसायिकाचे गुन्हेगारी टोळीकडून वर्षभर होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीची घटना बहुचर्चित ठरली आहे. संबंधित व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी धाडसाने पुढे येऊन समाजकंटकाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहनही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सोमवारी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -