Sunday, September 8, 2024
Homeराजकीय घडामोडीइचलकरंजी : ताराराणी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आज बैठक

इचलकरंजी : ताराराणी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आज बैठक

इचलकरंजी/online team
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ताराराणी पक्षातर्फे आमदार प्रकाश आवाडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर निवडणूकीच्या पुढील नियोजनार्थ शनिवार 13 एप्रिल रोजी ताराराणी पक्ष कार्यालयात सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व आवाडे समर्थकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी दिली.

ताराराणी पक्षाच्या वतीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आमदार प्रकाश आवाडे हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची घोषणा शुक्रवारी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर निवडणूकीतील पुढील दिशा, रणनिती याच्या नियोजनार्थ ताराराणी पक्ष कार्यालय येथे शनिवारी सकाळी 10 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस ताराराणी पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व आवाडे समर्थकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. दत्तवाडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -