Thursday, May 16, 2024
Homeकोल्हापूरमुख्यमंत्री शिंदे अचानक कोल्हापूर दौऱ्यावर; राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता!

मुख्यमंत्री शिंदे अचानक कोल्हापूर दौऱ्यावर; राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक कोल्हापूर दौऱ्यावर(political marketing) येत आहेत. त्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. ते सायंकाळी लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. आमदार प्रकाश आवाडे यांनी आजच हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचेही संदर्भ या दौऱ्यामागे आहेत.

 

श्री. शिंदे आज दुपारनंतर कोल्हापूर(political marketing) दौऱ्यावर येत आहेत. ते दुपारी अडीच वाजता येथील विमानतळावर दाखल होतील. तेथून एका हॉटेलमध्ये थांबून सायंकाळी सव्वापाच वाजता राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी भेट देतील. क्षीरसागर यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांचे सांत्वन करण्यासाठी ते जाणार आहेत.

 

तेथून सहा वाजता ते विश्‍वपंढरी सांगवडेकर महाराज मठाकडे जातील. त्यानंतर हॉटेल पॅव्हेलियनमध्ये विविध संघटना प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते पावणेआठच्या सुमारास कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील महायुतीच्या प्रचाराचा आढावा घेणार आहेत.

यामध्ये हातकणंगले मतदारसंघाबाबत विशेष चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात आमदार प्रकाश आवाडे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आमचे नेते आहेत, असेही सांगून त्यांनी स्वतःच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात ते प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

महाविकास आघाडीनेही हातकणंगले येथे शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत रंगतदार होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे अचानक कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे दौऱ्यात राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -