Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रराखी सावंतला सुप्रीम कोर्टाचा झटका, चार आठवड्यात सरेंडर करण्याचे आदेश; काय आहे...

राखी सावंतला सुप्रीम कोर्टाचा झटका, चार आठवड्यात सरेंडर करण्याचे आदेश; काय आहे प्रकरण ?

मनोरंजनसृष्टीतील काँट्रोव्हर्सी क्वीन अभिनेत्री राखी सावंत हिला सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार चार आठवड्यात सरेंडर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. एवढंच नव्हे तर राखी सावंतने जामीनासाठी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राखी सावंतचा माजी पती आदिल दुर्रानी याचा अश्लील व्हिडिओ लिक केल्याप्रकरणी राखी सावंत वर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

राखी सावंत गेल्या काही महिन्यांपासून दुबईमध्ये वास्तव्यास आहे. राखीचा माजी पती आदिल दुर्रानी याने तिच्या विरोधात एफआयआर दाखल केल्याने ती भारताबाहेर रहात आहे. राखीने आपले काही खासगी व्हिडीओ लीक केले असा आरोप आदिलने केला होता. आणि याच आरोपांमुळे राखीविरुद्ध अश्लील व्हिडिओ लीक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रिपोर्ट्सनुसार, या एफआयआरनंतर राखी अटक टाळण्यासाठी दुबईला पळून गेली होती.

 

खरंतर, आदिलचे खासगी व्हिडिओ लीक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर राखीने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने राखीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. आदिलच्या तक्रारीनंतर राखी सावंतवर भारतीय दंड संहिता (IPC) कलम 500 अन्वये आणि गुन्हा करण्याच्या उद्देशाने अश्लील व्हिडिओ प्रकाशित केल्याच्या कलम 34 अंतर्गत मानहानीचा आरोप करण्यात आला. त्यानंतर तिने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयानेही तिचा अर्ज फेटाळून लावल्याने राखीच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

 

डिसेंबर 2022 मध्ये राखी सावंतने सोशल मीडियावर दावा केला होता की तिने आदिल दुर्रानीशी लग्न केले आहे. या लग्नाला आदिलनेही दुजोरा दिला होता. पण लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच राखीने आदिलवर घरगुती हिंसाचार आणि छळाचा आरोप केला. याप्रकरणी तिने तक्रारही दाखल केली होती. राखीच्या तक्रारीनंतर आदिलला पोलिसांनी अटक केली, मात्र नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. तुरुंगातून सुटल्यानंतर आदिलने राखीवर त्याचे वैयक्तिक व्हिडिओ लीक केल्याचा आरोप केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -