Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रसलमान खाननंतर जितेंद्र आव्हाड बिष्णोई गँगच्या रडारवर, लाखो रुपयांची मागणी करत…

सलमान खाननंतर जितेंद्र आव्हाड बिष्णोई गँगच्या रडारवर, लाखो रुपयांची मागणी करत…

बॉलीवूड अभिनेता सलामान खान याच्या घरावर नुकताच गोळीबार झाला होता. त्यानंतर मुंबई पोलीस तातडीने कामाला लागले. या प्रकरणाचा छडा लावला. त्याचवेळी या गोळीबार घटनेची जबाबदारी सोशल मीडियाच्या माध्यमातून बिष्णोई गँगने घेतली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली. त्यानंतरही बिष्णोई गँगने आपले उद्योग थांबवले नाहीत. या गँगने बॉलीवूडनंतर राजकीय लोकांना लक्ष केले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड या गँगच्या रडारवर आले आहे. या गँगने त्यांना धमकी दिली आहे. लाखो रुपयांची खंडणी मागितली आहे.

लॉरेंस बिश्नोई गँग महाराष्ट्रात सक्रीय

लॉरेंस बिश्नोई हा पंजाबमधील गँगस्टर आहे. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झाले आहे. पंजाबी गायक सिधू मूस वाला याची हत्या या गँगने केली. त्यानंतर त्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या गँगमधील दोघांनी मागील आठवड्यात सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पाच राऊंड फायर केल्या होत्या. या प्रकरणात तपासासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली. पोलिसांच्या या पथकाने गुजरातमधून विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल यांना अटक केली. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. ही गँग आता महाराष्ट्रात सक्रीय होऊ लागली आहे.

 

आता थेट ऑस्ट्रेलियावरुन धमकी

सलमान खानचे प्रकरण शांत होत नाही, तोच राजकीय नेत्यांना धमक्या या गँगकडून दिल्या जात आहेत. जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन आला आहे. धमकी देणाऱ्याने लाखो रुपयांची खंडणी मागितली आहे. पैसे न दिल्यास अन्यथा सलमान खान सारखे होणार असल्याचे म्हटले आहे. त्याने आपले नाव रोहित गोदारा म्हटले आहे. हा फोन ऑस्ट्रेलियातून आला आहे.

दरम्यान या प्रकरणात जितेंद्र आव्हाड पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहे. मुंबई पोलीस सलमान खान प्रकरणासारखे या प्रकरणातील आरोपींना शोधून बेड्या ठोकतील, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -