लोकसभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून सर्वच नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी आता प्रचंड जोर लावला आहे. खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सभेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे येत्या शुक्रवारी हुपरी येथे येणार आहेत.
यावेळी त्यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती दलित मित्र अशोकराव माने यांनी दिली आहे. या सभेला हसन मुश्रीफ धनंजय महाडिक प्रकाश आवाडे विनय कोरे सुरेश हळवणकर अमल महाडिक हे जिल्ह्याचे नेते उपस्थित राहणार असून सभेत मार्गदर्शन देखील करणार आहेत.
ज्यावेळी अशोकराव माने यांनी ही माहिती दिली त्यावेळी महावीर गाठ मुरलीधर जाधव दिनकरराव ससे शिरीष देसाई मंगळवार माळगे दौलतराव पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.