Sunday, August 3, 2025
Homeक्रीडाटी20 वर्ल्डकप स्पर्धेआधीच टीम इंडियाच्या शिरपेचात मानाचा तुरा, आता केली अशी कामगिरी

टी20 वर्ल्डकप स्पर्धेआधीच टीम इंडियाच्या शिरपेचात मानाचा तुरा, आता केली अशी कामगिरी

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. 15 खेळाडूंची चमू जाहीर झाला असून आतापासूनच प्लेइंग इलेव्हनची चर्चा रंगली आहे. गेल्या 11 वर्षांपासून भारतीय संघाची आयसीसी चषकाची झोळी रिती आहे. त्यामुळे टीम इंडिया यंदा तरी आयसीसी चषक पटकावेल का याची उत्सुकता लागून आहे. खरं तर अमेरिक आणि वेस्ट इंडिजचं मैदान भारतीय खेळाडूंना किती फळतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भारतीय मैदानात खेळाडूंची आकडेवारी एकदम जबरदस्त आहे.

मात्र हीच आकडेवारी विदेशी भूमीवर कमकुमवत असल्याचं वारंवार अधोरेखित झालं आहे. असं सर्व गणित असताना भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आयसीसीने वार्षिक क्रमवारी जाहीर केली आहे. यात वनडे आणि टी20 फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा दबदबा दिसून आला आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी ही टीम इंडियासाठी सकारात्मक बाजू आहे असं म्हंटलं वावगं ठरणार नाही. टी20 मध्ये टीम इंडियाचे 264 गुण आहेत आणि वार्षिक रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ 257 गुणांसह दुसऱ्या आणि इंग्लंडचा संघ 252 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचं मात्र नुकसान झालं असून सातव्या स्थानावर आहे.

वनडे फॉर्मेटमध्ये भारतीय संघ 112 गुणांसह टॉपवर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ 116 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे टेस्ट रँकिंगमध्ये टीम इंडियाचं नुकसान झालेलं दिसत आहे. ऑस्ट्रेलियाने या क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे. मागच्या वर्षी अव्वल स्थानी टीम इंडिया होती. मात्र यंदा अव्वल स्थान ऑस्ट्रेलियाच्या वाटेला गेलं आहे. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाला पराभूत केलं होतं. ऑस्ट्रेलियाने हा सामना 209 धावांनी जिंकला होता. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचे पॉइंट 124 झाले आणि 4 गुणांनी टीम इंडियाच्या पुढे निघून गेला. इंग्लंडचा संघ 105 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

कसोटी रँकिंगमध्ये मे 2021 नंतर कामगिरीचं आकलन केलं गेलं आहे. भारतीय संघाने जानेवारी 2021 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियावर 2-1 ने मात मिळवली होती. त्यामुळे ही मालिका या मोजणीत नाही. मे 2021 आणि मे 2023 मधील जवळपास सर्वच निकाल 50 टक्के होता आणि मागच्या 12 महिन्यात झालेल्या मालिका आहे. यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचा विजयही सहभागी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -