Saturday, August 2, 2025
Homeराशी-भविष्य२०२५ पर्यंत मिळणार श्रीमंतीचे सुख! राहूच्या प्रभावाने ‘या’ राशींचे चमकणार भाग्य

२०२५ पर्यंत मिळणार श्रीमंतीचे सुख! राहूच्या प्रभावाने ‘या’ राशींचे चमकणार भाग्य

ज्योतिषशास्त्रात नवग्रहातील प्रत्येक ग्रहाला खूप महत्त्वपूर्ण मानले जात. हे ग्रह ठरावीक वेळेनंतर राशी परिवर्तन करतात. या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीवर होत असल्याचे पाहायला मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू ग्रह अशुभ स्थितीत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना समोरे जावे लागते. त्यामुळेच राहूला ‘मायावी ग्रह’ म्हटले जाते.

 

राहू ग्रहाचे राशी परिवर्तन झाल्यास तो एका राशीत १८ महिने राहतो. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी राहू ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला होता. राहू केवळ दीड वर्षातून एकदा आपली चाल बदलत असल्याने १८ मे २०२५ पर्यंत राहू मीन राशीतच राहणार आहे. त्यानंतर राहू शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करील. तत्पूर्वी मीन राशीतील राहू काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरेल.

 

वृषभ

 

वृषभ राशीत राहू अकराव्या घरात विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना या काळात खूप फायदा होईल. आकस्मिक धनलाभ होतील. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आयुष्यात सुखाचे दिवस येतील आणि कुटुंबातही शुभ कार्ये पार पडतील. पैशांची बचत कराल, गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. नवीन प्रवास घडतील. त्यामुळे जोडीदाराला वेळ देणे शक्य होणार नाही; परंतु करिअरमध्ये खूप यश मिळवाल.

 

मिथुन

 

राहू मिथुन राशीच्या नवव्या घरात स्थित असून, त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींचे भाग्य उजळेल. कामासाठी परदेशात प्रवास कराल. आर्थिक स्थिती मजबूत असेल; परंतु खर्चांवर नियंत्रण ठेवता येणार नाही. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल. या काळात तुमची पदोन्नती होईल. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

 

वृश्चिक

 

वृश्चिक राशीत राहू पाचव्या घरात स्थित आहे आणि त्यामुळे तो वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप भाग्यकारी ठरेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. तुम्ही नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. कुटुंबातील वाद मिटतील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ मिळेल. तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. आरोग्य उत्तम राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -