Tuesday, July 29, 2025
Homeक्रीडामुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव, कोलकाता प्लेऑफसाठी पात्र

मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव, कोलकाता प्लेऑफसाठी पात्र

 

आयपीएल 2024 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे. या स्पर्धेत हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा भिडणार आहेत. यापूर्वी वानखेडेवर रंगलेल्या सामन्यात कोलकात्याने मुंबई इंडियन्सला पराभवाचं पाणी पाजलं होतं. कोलकात्याने विजयासठी फक्त 170 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण मुंबईचा संघ या धावाही करू शकला नाही. मुंबईचा डाव 145 धावांवर आटोपला. कोलकात्याने मुंबईचा 24 धावांनी पराभव केला. आता मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. मात्र येथून पुढे प्रत्येक सामना आत्मसन्मानासाठी खेळला जात आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. पावसामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाल्याने 16 षटकांचा होणार आहे. दोन्ही संघांना 16 षटकं खेळायला मिळतील.पॉवर प्लेचा खेळ 1-5 षटकादरम्यान होईल. या सामन्यात एकच गोलंदाजाला 4 षटकं टाकता येतील. तर चार गोलंदाज जास्तीत जास्त तीन षटकं टाकू शकतात.

कोलकात्याने मुंबई इंडियन्सला पुन्हा केलं पराभूत

कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला दुसऱ्यांदा पराभवाचं पाणी पाजलं आहे. मुंबई इंडियन्सला 158 धावांचं आव्हान दिलं होतं मात्र मुंबईचा संघ 139 धावा करू शकला. या विजयासह कोलकाता प्लेऑफसाठी अधिकृतरित्या पात्र ठरलेला पहिला संघ ठरला आहे.

नमन धीरने मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देण्याचा आटोक्यात प्रयत्न केला. मात्र हार्षित राणाच्या गोलंदाजीवर बाद झाला.

टिम डेविडने संघाला खूप गरज असताना नांगी टाकली. फटकेबाजी करण्याची गरज असताना 0 धावा करून बाद झाला. आंद्रे रसेलने त्याला खातंही खोलू दिलं नाही.

हार्दिक पांड्या फक्त 2 धावा करून तंबूत परतला आहे. वरुण चक्रवर्तीने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -