Sunday, August 3, 2025
Homeक्रीडादिल्लीच्या विजयानंतर या टीमची प्लेऑफमध्ये धडक, आता 2 जागांसाठी चुरस

दिल्लीच्या विजयानंतर या टीमची प्लेऑफमध्ये धडक, आता 2 जागांसाठी चुरस

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 64 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने आपल्या साखळी फेरीतील मोहिमेचा शेवट विजयासह केला. दिल्लीने आपल्या 14 व्या आणि अखेरच्या साखळी सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर 19 धावांनी विजय मिळवला. दिल्लीने पहिले बॅटिंग करताना 208 धावा केल्या. त्यामुळे दिल्लीने लखनऊला विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं. लखनऊच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत विजयासाठी प्रयत्न केले.

अर्शद खान याने 33 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 58 धावा करुन लखनऊच्या आशा कायम ठेवल्या. मात्र दुसऱ्या बाजूने अर्शदला अपेक्षित साथ न मिळाल्याने लखनऊला पराभवाला सामोरे जावं लागलं. लखनऊला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 189 धावाच करता आल्या.

दिल्लीचे या साखळी फेरीतील 14 सामने पूर्ण झाले. दिल्लीच्या नावावर 7 विजय आणि 14 गुण आहेत. दिल्लीने यासह आपलं जर तरचं आव्हान कायम राखलंय. तर लखनऊ सुपर जायंट्सची पराभवानंतरही आशा कायम आहे. या सामन्यानंतर प्लेऑफमध्ये पोहचणारी दुसरी टीम निश्चित झाली आहे. दिल्लीच्या विजयामुळे राजस्थान रॉयल्सला मोठा फायदा झाला आहे. दिल्लीने सामना जिंकताच राजस्थानने अधिकृतपणे प्लेऑफमध्ये धडक मारली. कोलकाता नाईट रायडर्सनंतर राजस्थान प्लेऑफमध्ये पोहचणारी दुसरी टीम ठरली आहे. आता उर्वरित 2 जागांसाठी 5 संघांमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर मॅकगुर्क, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, गुलबदिन नायब, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि खलील अहमद.

 

लखनऊ सुपर जायंट्स प्लेईंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, युधवीर सिंग चरक, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक आणि मोहसिन खान.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -