Monday, February 24, 2025
Homeक्रीडाआरसीबीला पुढच्या पर्वात केएल राहुलची गरज! या गणितामुळे शक्यता वाढली

आरसीबीला पुढच्या पर्वात केएल राहुलची गरज! या गणितामुळे शक्यता वाढली

आयपीएल 2024 स्पर्धा सुरु असताना आतापासूनच 2025 पर्वाचे वेध लागले आहे. या स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यामुळे कोणता खेळाडू पुढच्या वर्षी कोणत्या संघात असेल सांगता येत नाही. त्यामुळे मेगा लिलावाची आतापासूनच उत्सुकता लागून आहे. त्यात मेगा लिलावात केएल राहुल आला की त्याच्यासाठी आरसीबीकडून फिल्डिंग लावली जाण्याची शक्यता आहे. सध्या केएल राहुल लखनौ सुपर जायंट्सकडून खेळत आहे. त्याला पुढच्या पर्वाआधी रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. या पर्वात केएल राहुलच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्सची हवी तशी कामगिरी झाली नाही. त्यामुळे त्याला रिलीज केलं जाईल अशी चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. या वादाला केएल राहुल आणि संजीव गोयंका यांच्या त्या कथित व्हिडीओचीही किनार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे खरंच तसं झालं तर मात्र केएल राहुलसाठी आरसीबी फिल्डिंग लावू शकते. त्याला कारणही तसंच आहे.

आयपीएलच्या 18 व्या पर्वात केएल राहुल दिसण्याची शक्यता आहे. त्याला संघात घेण्यासाठी सर्वाधिक उत्सुकता ही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून दिसेल. केएल राहुल आयपीएलमध्ये आरसीबीसाठी 19 सामने खेळला आहे. यावेळी त्याने 14 डावात 4 अर्धशतकांसह 417 धावा केल्या आहेत. तसेच त्याचा अनुभव पाहता त्याच्याकडे कर्णधारपदही सोपवलं जाऊ शकतं. कारण आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि यष्टीरक्षक दिनेश कार्तिकसाठी हे शेवटचं पर्व ठरू शकतं. फाफ डु प्लेसिस हा 39 वर्षांचा, तर दिनेश कार्तिक 38 वर्षांचा आहे. त्यामुळे या दोघांना संघ रिलीज करण्याची दाट शक्यता आहे.

केएल राहुलला संघात घेऊन आरसीबी दोन पदं भरू शकते. लखनौ सुपर जायंट्सला दोनदा प्लेऑफमध्ये घेऊन जात केएल राहुलने आधीच नेतृत्व गुणाची क्षमता दाखवली आहे. तसेच आयपीएलमध्ये यष्टीरक्षकाची भूमिकाही चोखपणे बजावली आहे. त्यामुळे मेगा लिलावात खरंच तसं घडतं का याची उत्सुकता लागून आहे. तसेच केएल राहुल लिलावात दिसला तर कोण कोण त्याच्यासाठी बोली लावेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मेगा लिलावाबाबत आतापासून उत्सुकता ताणली गेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -