Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनऐश्वर्या राय दुखापतग्रस्त; हातावरील पट्टी पाहून चाहत्यांकडून काळजी व्यक्त

ऐश्वर्या राय दुखापतग्रस्त; हातावरील पट्टी पाहून चाहत्यांकडून काळजी व्यक्त

 

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अभिनेत्री ऐश्वर्या राय ही कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाली आहे. बुधवारी संध्याकाळी ती मुलगी आराध्यासह मुंबई विमानतळावर पोहोचली. यावेळी तिच्या हाताला बांधलेली पट्टी पाहून चाहत्यांनी काळजी व्यक्त केली.

 

अभिनेत्री ऐश्वर्या राय दरवर्षी कान फिल्म फेस्टिव्हलला आवर्जून हजेरी लावते. या फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याचा रेड कार्पेट लूक लक्षवेधी ठरतो. संपूर्ण जगभरात तिच्या अनोख्या लूक्सची चर्चा होते. यंदाच्या वर्षीही ऐश्वर्या या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाली आहे. बुधवारी संध्याकाळी ती तिची मुलगी आराध्यासोबत मुंबई एअरपोर्टवर दिसली. मात्र यावेळी ऐश्वर्याचा हात पाहून अनेकांना प्रश्न पडला. यावेळी ऐश्वर्याच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे त्या हाताला पट्टी बांधली होती. पापाराझींनी ऐश्वर्या आणि आराध्याचा व्हिडीओ शूट केला, मात्र यावेळी ती तिच्या दुखापतीविषयी काहीच बोलली नाही. या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे.

 

पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या तिच्या मुलीसोबत कारमधून बाहेर पडते. यावेळी तिच्या उजव्या हाताला पट्टी बांधलेली दिसून येते. कारमधून बाहेर पडल्यानंतर ऐश्वर्या मीडियाकडे पाहून हसत अभिवादन करते आणि त्यानंतर विमानतळावर आत प्रवेश करते. यावेळी आराध्यासुद्धा पापाराझींसमोर हसताना आणि त्यांना हॅलो करताना दिसून येते.

 

या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिलं, ‘ती कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये हाताला पट्टी बांधूनच जाईल का?’ तर ‘रेड कार्पेटवर ऐश्वर्या अशा अवस्थेत कशी जाईल’, असाही सवाल दुसऱ्या युजरने केला आहे. ‘अशा अवस्थेतही ती तिच्या मुलीची काळजी खूप चांगल्याप्रकारे घेत आहे’, अशा शब्दांत काहींनी ऐश्वर्याचं कौतुक केलं. कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी ऐश्वर्याच्या नव्या लूकविषयीही उत्सुकता व्यक्त केली.

 

ऐश्वर्याने 2002 मध्ये सर्वांत पहिल्यांदा कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. यावेळी रेड कार्पेटवर तिने नीता लुल्लाने डिझाइन केलेली साडी आणि त्यावर भरजरी सोन्याचे दागिने परिधान केले होते. त्यावेळी ऐश्वर्याच्या ‘देवदास’ या चित्रपटाचा प्रीमिअर या फेस्टिव्हलमध्ये करण्यात आला होता. सहअभिनेता शाहरुख खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हेसुद्धा ऐश्वर्यासोबत उपस्थित होते. तेव्हापासून ऐश्वर्या दरवर्षी या फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावते.

 

ऐश्वर्यासह अदिती राव हैदरी, शोभिता धुलिपाला आणि कियारा अडवाणी हे सेलिब्रिटीसुद्धा कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत. यावर्षी उर्वशी रौतेला आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री दिप्ती साधवानी यांनीसुद्धा रेड कार्पेटवर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -