Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रमुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी 20 लाखांचे कर्ज घेतले, मुलाने 28 लाखांची नोकरी सोडली,...

मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी 20 लाखांचे कर्ज घेतले, मुलाने 28 लाखांची नोकरी सोडली, यूपीएससीची तयारी केली, निकाल आल्यावर..

जगातील सर्वात कठीण परीक्षेत संघ लोकसेवा आयोग (upsc) परीक्षेचा समावेश होतो. या परीक्षेत यश मिळवणाऱ्या युवकांच्या यशोगाथा समोर येत आहे. दिल्लीत किराणा दुकान चालवणारे सुभाषचंद्र गोयल आनंदात आहे. कारण त्यांचा मुलगा आयुष याने यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी त्याने 28 लाख रुपये पॅकेज असणारी नोकरी सोडली. त्यावेळी शिक्षणासाठी घेतलेले 20 लाख रुपयांचे कर्ज कसे भरणार? हा प्रश्न त्याचे वडील सुभाषचंद्र गोयल यांना पडला होता. अखेर मुलाने यूपीएससी क्रॅक केल्यानंतर त्यांची चिंता मिटली अन् त्यांना आनंद झाला.

एमबीएनंतर 28 लाख रुपयांचे पॅकेज

यूपीएससी परीक्षेत 171 रॅक मिळवणारा आयुष हा केरळमधील कोझीकोड आयआयएममधून एमबीआय झाला. त्यानंतर त्याला एका मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळाली. त्याला 28 लाख रुपयांचे पॅकेज होते. यामुळे त्याच्या शिक्षणासाठी घेतलेल्या 20 लाख रुपये कर्जाची चिंता मिटली होती. परंतु नोकरी करुन सात महिनेच झाले होते. आयुषने नोकरी सोडली आणि घरात चिंता सुरु झाली.

 

नोकरी सोडण्याचा धक्कादायक निर्णय

आयुषचा नोकरी सोडण्याचा निर्णयावर वडिलांनी त्याला सांगितले की, 28 लाखांचे पॅकेज असताना नोकरी का सोडत आहे. आयुषने यूपीएससीची तयारी करणार असल्याचे सांगितले. त्याचे वडील म्हणाले, ही खूप कठीण परीक्षा आहे. रिस्क खूप जास्त आहे. आता नोकरी नाही तर कर्ज कसे फेडणार? परंतु आयुषने आपला निर्णय घेतला होतो. त्याच्या वडिलांनाही माहीत होते, आयुषने ज्या ठिकाणी पाऊल टाकले आहे, त्याला आतातपर्यंत यशच मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी चिंता सोडून त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय घेतला.

कोणतीही कोचिंग लावली नाही

आयुषचे वडील दिल्लीत किराणा दुकान चालवतात. त्यांच्या डोक्यावर 20 लाखांचे कर्ज होते. त्यानंतरही त्यांनी मुलाच्या निर्णयाला पाठिंबा दिला. दुसरीकडे आयुषने यूपीएससी परीक्षेच्या तयारीच्या नियोजनही काही कमी ठेवले नाही. तो कोणत्याही कोचिंगमध्ये गेला नाही. घरी राहून 10 ते 12 तास अभ्यास केला. इंटरनेटवरील पुस्तके आणि UPSC संबंधित व्हिडिओ हा आयुषच्या तयारीचा महत्त्वाचा भाग होता. त्याच्या नोट्सही त्याने स्वतः तयार केल्या. आयुषचे एकच उद्दिष्ट होते – पूर्ण समर्पण आणि तयारीने UPSC परीक्षा उत्तीर्ण करणे होय. अखेर त्याने परीक्षेत 171 रँक मिळवली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -