Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून अंदमानमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी येणार

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून अंदमानमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी येणार

उन्हाने घामाघूम झालेल्या सर्वांसाठी चांगली बातमी आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला आहे. मान्सून १९ मे रोजी अंदमानमध्ये दाखल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लगबगीने शेतीच्या कामांना लागावे लागणार आहे. मान्सून ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. तसेच महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात दाखल होणार आहे.

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला

मे महिना सुरु झाला म्हणजे नैऋत्य मान्सूनची वाट सर्व जण पाहतात. यंदा मान्सून अंदमान निकोबार बेटांमध्ये वेळेआधी येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले होते. आयएमडीने १९ मे ही तारीख अंदमानमधील मान्सूनच्या आगमानाची दिली गेली होती. त्यानुसार अंदमान, मालदीव, कोमोरिनच्या काही भागात दाखल झाला आहे. बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून पोहचला आहे. मान्सून दाखल झाल्यामुळे अंदमानमध्ये पाऊस सुरु झाला आहे. यासंदर्भात ट्विट पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी केले आहे. दरवर्षी अंदमानमध्ये २२ मे पर्यंत मान्सून दाखल होतो. यंदा तीन दिवस आधीच आला आहे.

केरळमध्ये दहा दिवसांत पोहचणार

मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर आता त्याची वाटचाल केरळकडे सुरु होणार आहे. अंदमानमधून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना केरळपर्यंत पोहचण्यासाठी दहा दिवस लागतात. मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर ३१ मे पर्यंत केरळमध्ये दाखल होणार आहे.

मान्सूनपूर्व पाऊस केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल या भागात होणार आहे. 19 आणि 20 मे रोजी या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नैऋत्य मान्सून ३१ मे रोजी केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. 22 मे रोजी केरळमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 21 मे 2024 रोजी 204.5 मिमी पेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. मेघालयात 19 आणि 20 मे रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -