Sunday, September 8, 2024
Homeक्रीडाप्लेऑफ सामन्यात पावसाने हजेरी लावली तर नियम काय? 

प्लेऑफ सामन्यात पावसाने हजेरी लावली तर नियम काय? 

आयपीएल 2024 स्पर्धेत पावसामुळे दोन संघांना सर्वाधिक फटका बसला असं म्हणावं लागेल. गुजरात टायटन्सचं प्लेऑफचं गणित पावसामुळे फिस्कटलं. तर राजस्थान रॉयल्सला टॉप 2 मध्ये राहण्याची संधी पावसामुळे हिरावून गेली. आता पाऊस प्लेऑफच्या सामन्यातही हजेरी लावेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्लेऑफमध्ये चार संघांची वर्णी लागली आहे. प्लेऑफ 1 मध्ये 21 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. तर प्लेऑफच्या एलिमिनेटर 1 फेरीत 22 मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने येणार आहेत.

प्लेऑफचा पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. तर एलिमिनेटर सामनाही याच ठिकाणी होणार आहे. या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुसळधार पाऊस पडला तर सामना होईल की नाही याबाबत साशंकता आहे. पण क्रीडाप्रेमींना याबाबत चिंता करण्याची गरज नाही. प्लेऑफ सामन्यांसाठी राखीव दिवस आहे.

नियोजित दिवशी सामना संपवण्यासाठी 120 मिनिटे म्हणजेच 2 तासांचा अधिकचा वेळ दिला आहे. साखळी सामन्यांसाठी ही वेळ 60 मिनिटं म्हणजेच एका तासाची होती. पावसामुळे सामना न झाल्यास राखीव दिवशी खेळवला जाईल. राखीव दिवशीही क्वॉलिफायर 1 सामन्यात पावसाने हजेरी लावली आणि सामना झाला नाही तर टेबल टॉपर कोलकाता नाईट रायडर्स अंतिम फेरीत जाईल. असंच एलिमिनेटर सामना रद्द झाल्यास राजस्थान रॉयल्स पुढच्या फेरीत जाईल. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध हैदराबाद सनरायझर्स आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना होणार आहे.

 

आयपीएल 2024 प्लेऑफचं वेळापत्रक:

क्वॉलिफायर 1: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 21 मे रोजी (मंगळवार) संध्याकाळी 7:30 वाजता (अहमदाबाद)

एलिमिनेटर: राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 22 मे रोजी (बुधवार) संध्याकाळी 7:30 वाजता (अहमदाबाद)

 

क्वालिफायर 2: एलिमिनेटरचा विजेता संघ क्वालिफायर 1 मधील हरलेल्या संघा विरुद्ध खेळेल. हा सामना शुक्रवार, 24 मे रोजी चेन्नई येथे संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाईल.

 

अंतिम फेरी: क्वालिफायर 1 चा विजेता आणि क्वालिफायर 2 चा विजेता, 26 मे रोजी (रविवारी) चेन्नई येथे संध्याकाळी 7:30 वाजता अंतिम फेरीचा सामना खेळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -