Sunday, December 22, 2024
HomeBlogइचलकरंजी: देवांग समाज आणि हटकर कोष्टी सेवाभावी ट्रस्टतर्फे मोफत नेत्र चिकित्सा शिबिराला...

इचलकरंजी: देवांग समाज आणि हटकर कोष्टी सेवाभावी ट्रस्टतर्फे मोफत नेत्र चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी/प्रतिनिधी –
लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर ट्रस्ट संचलित लायन्स आय हॉस्पिटल इचलकरंजी, श्री देवांग समाज, हटकर कोष्टी सेवाभावी ट्रस्ट, चौंडेश्‍वरी महिला समाज सेवा मंडळ, कोष्टी कला महोत्सव, जायंटस ग्रुप ऑफ उत्कर्षा सहेली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र चिकित्सा तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

चौंडेश्‍वरी मंदिर येथे संपन्न शिबीराचा शुभारंभ देवांग समाज अध्यक्ष विश्‍वनाथ मुसळे यांच्या शुभहस्ते चौंडेश्‍वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन आणि श्रीफळ वाढवून करण्यात आला. सूत्रसंचालन व स्वागत हटकर कोष्टी सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील सरबी यांनी केले. याप्रसंगी देवांग समाज उपाध्यक्ष राजेंद्र सांगले, माजी उपनगराध्यक्ष रमेश कबाडे, चौंडेश्‍वरी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन महेश सातपुते, समाजाचे माजी  अध्यक्ष मोहनराव सातपुते, चौंडेश्‍वरी महिला समाज अध्यक्षा सौ दीपा सातपुते, जायंटस ग्रुप ऑफ सहेलीच्या प्रेसिडेंट सौ. राजश्री माने, कोष्टी कला परिवारचे अध्यक्ष श्रीनिवास फाटक इत्यादी उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना सौ. शारदा कवठे यांनी केली. हटकर कोष्टी सेवाभावी ट्रस्टचे कार्याध्यक्ष हेमंत कबाडे यांनी शिबीरासंबंधी माहिती दिली. अध्यक्ष स्थानावरून विश्‍वनाथ मुसळे यांनी मनोगतामध्ये सर्वच सहभागी सेवा संस्थेच्या समाजोपयोगी कार्यामध्ये कोणतीही मदत लागल्यास मदत करण्याचे अभिवचन दिले.

शिबिरामध्ये 110 लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी शंभर जणांना मोफत चष्मे तसेच दहाजणांचे मोतीबिंदूंचे ऑपरेशन मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिबिर काळात चौंडेश्‍वरी सूतगिरणीचे चेअरमन संजय कांबळे, समाजाचे सेक्रेटरी मधुकराव वरुटे, मुरलीधर निमणकर, प्रमोद फाटक, सौ. विद्याताई मुसळे, सौ. सायली होगाडे, सौ. भारती कांबळे, सौ. माया भंडारे, सौ. संगीता धुत्रे, सौ. शिल्पा गांजवे, सौ. दुर्गा लांडगे, सौ. ज्योती वरुटे, राजेंद्र बिद्रे, कुमार कबाडे, संजय सातपुते, सांगोल्याचे अध्यक्ष डॉ. अनिलजी कांबळे, भूषण म्हेत्रे, सुनील म्हेतर, प्रशांत सपाटे, भाऊसो साखरे, श्री. रेडेकर, अशोक वरूटे, गजानन ऊंदुरे, बाल मुकुंद व्हनुंगरे, श्रीमती सुशीला फाटक, पुंडलिकराव वरुटे आदी मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

शिबिरासाठी चौंडेश्‍वरी मंदिरातील सुनील कार्वेकर, श्री चव्हाण व त्यांचे सर्व सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिरामध्ये लायन्स आय हॉस्पिटलचे व्यवस्थापक शिवकुमार महाडिक आणि त्यांच्या स्टाफने सर्व रुग्णांची तपासणी केली. शेवटी आभार प्रदर्शन चौंडेश्‍वरी महिला समाज मंडळ इचलकरंजी च्या विद्यमान अध्यक्षा सौ दीपा सातपुते यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -