ताजी बातमी ऑनलाइन टीम
एका हॉटेल चालकाला गावठी बनावटीचे पिस्तूल दाखवून वीस लाखांची मागणी केल्याप्रकरणी, दोघांना अटक करण्यात आली आहे. विनोद चंदू कांबळे (वय.२९), सतीश चन्नाप्पा मिंनचीकर. (वय .३०) (दोघे रा. मेंढेगिरी ता. जत) यांच्यावर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (जत क्राईम) दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून, याबाबतची फिर्याद विवेक विजय चव्हाण यांनी जत पोलिसांत दिली आहे.
संशयित आरोपी विनोद कांबळे व सतीश मिंनचीकर या दोघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपी यांच्याकडून पोलिसांनी गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत चार काडतुसे जप्त केले आहे.
सांगली गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -