लोकसभा निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली आहे. त्यामुळे भावी मंत्र्यांमध्ये आनंदाची लाट दिसतेय. मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात केला जाणार, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
आता राज्यात महायुतीतील आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहे. पावसाळी अधिवेशनाअगोदरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात यावा, अशी मागणी तिन्ही पक्षांच्या आमदारांकडून मागणी केली जात आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. यावर काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीतल्या बैठकीत याविषयी माहिती दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं (Maharashtra Government Cabinet Expansion) नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण बघायला मिळत आहे. त्यामुळेच पावसाळी अधिवेशनाआधीच मंत्रिमंडळ विस्तार केला जावा, अशी मागणी आमदारांकडून होत असल्याचा अंदाज आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनाअगोदर २७ जून रोजी केला जाईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
‘या’ शिलेदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याचा अंदाज
लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाची कामगिरी अजित पवार गटापेक्षा सरस राहिली आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केलेल्या शिलेदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याचा अंदाज (Mansoon Assembly Session 2024) आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला एक राज्यमंत्री पद मिळालं आहे. तर अजित पवार गटाने राज्यमंत्री पद घेतलेलं नाही. त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदासाठी थांबण्याची तयारी दाखवली आहे.
कोणत्या आमदारांची वर्णी लागणार?
संपूर्ण राज्याचं लक्ष या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. या मंत्रिमंडळात कोणत्या आमदारांची वर्णी लागणार याकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिदे गटातून आशिष जैस्वाल, यामिनी जाधव, संजय शिरसाट, (Eknath Shinde Ajit Pawar) भरत गोगावले, आणि लता सोनावणे यांच्या नावाची चर्चा आहे. तर अजित पवार गटाकडून अइंद्रनील नाईक, अण्णा बनसोडे, संग्राम जगताप आणि भाजपकडून आमदार नितेश राणे, मनीषा चौधरी, माधुरी मिसाळ, संजय कुटे, (BJP MLA) राणाजगजित सिंह पाटील, देवयानी फरांदे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.