गणेशोत्सव गतवर्षीप्रमाणेच यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन राज्य शासनाच्या सूचनेनुसार पोलिस दलासह महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे. आगामी काळात कोव्हिडच्या तिसर्या लाटेची शक्यताही वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस व महापालिकेच्या वतीने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यात मिरवणुकांवर बंदी, ऑनलाईन दर्शनावर भर यासह विविध सूचनांचा समावेश आहे.
परवानगी आवश्यक
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांनी महापालिका व स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे सक्तीचे केले आहे. कोल्हापूर महापालिकेने ‘एक खिडकी’ योजनेची व्यवस्था केली आहे. श्रीगणेशाची मूर्तीच्या उंचीलाही मर्यादा कायम असून सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट व घरगुती गणपतीकरिता 2 फुटांपर्यंतची उंची मर्यादा करण्यात आली आहे. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रीम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गर्दी नकोच
‘ब—ेक द चेन’अंतर्गत कोरोनाबाबतच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोर पालन करण्यात यावे. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास प्राथमिकता द्यावी.
ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करावी
गणेश दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक यासह सोशल मीडियावरून उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणार्या भाविकांसाठी शरीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सिंग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
वर्गणी-देणगीची सक्ती नको
उत्सवाकरिता वर्गणी-देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम व शिबिरांचे आयोजन करावे. यात रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, कोरोना, म्युकर मायकोसीस, मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय, तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
मिरवणुकांवर बंदी कायम
‘श्रीं’च्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या द़ृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. महापालिका विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेश मूर्तीच्या विसर्जनाकरिता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
यंदाही बाप्पाच्या उंचीवर मर्यादा….
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -