Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाENGvsIND : इंग्लंडची पहिल्या डावात घसघशीत आघाडी

ENGvsIND : इंग्लंडची पहिल्या डावात घसघशीत आघाडी


भारत आणि इंग्लंड याच्यातील तिसऱ्या कसोटीत ( ENGvsIND 3rd test D3 ) इंग्लंडचा पहिला डाव ४३२ धावांवर संपला. कालच्या ८ बाद ४२३ धावांपासून पुढे खेळताना इंग्लंडच्या तळातील फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. मोहम्मद शमीने क्रेग ओव्हरटर्नची खेळी ३२ धावांवर संपवली. त्यानंतर बुमराहने ओली रॉबिन्सनचा शुन्यावर त्रिफळा उडवत इंग्लंडचा डाव ४३२ धावांवर संपवला. याचबरोबर इंग्लंडने पहिल्या डावात ३५४ धावांची घसघशीत आघाडी घेतली.


भारताकडून मोहम्मद शमीने चांगला मारा करत ९५ धावात ४ बळी टिपले तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. भारतीय संघातील सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला या कसोटीत फारशी चमक दाखवता आली नाही. त्याने २२ षटके टाकत ९२ धावा दिल्या मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही.


इंग्लंडकडून पहिल्या डावात कर्णधार जो रुटने १२१ धावांची दमदार शतकी खेळी केली. त्याला डेव्हिड मलानने ७० धावा करुन चांगली साथ दिली. याचबरोबर हासीब हमीद ( ६८ ) आणि रोरी बर्न्स ( ६१ ) यांनीही अर्धशतकी खेळी केली.
इंग्लंडकडे पहिल्या डावात ३५४ धावांची आघाडी
बुमराहने रॉबिन्सनचा उडवला त्रिफळा, इंग्लंडचा पहिला डाव ४३२ धावात संपुष्टात
मोहम्मद शमीने ओव्हरटर्नची ३२ धावांची खेळी संपवली

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -