Sunday, December 22, 2024
Homeआरोग्यविषयकहिवाळ्यात सर्दी-खोकला होतो?, मग ‘या’ खास पदार्थांचा आहारात समावेश करा!

हिवाळ्यात सर्दी-खोकला होतो?, मग ‘या’ खास पदार्थांचा आहारात समावेश करा!

हिवाळा म्हटंल की, मस्त थंडगार वातावरण… या हंगामात आपल्याला पर्यटन स्थळांना भेट देण्यास आवडते. तसेच या हंगामात आपण गरमा-गरमा तेलकट तळलेले विविध पदार्थांचा आहारामध्ये देखील समावेश करतो. हिवाळ्यात खाणे-पिणे, नवीन कपडे घालणे आणि फिरणे यात एक वेगळाच आनंद असतो. पण या हिवाळ्यात रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. सर्दी, खोकला याची समस्या या हंगामात वाढते. म्हणून या हंगामात शरीराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

-सर्दी आणि खोकल्यासाठी एक किंवा दोन आठवडे नियमित औषध घेऊ शकता. पण सर्दी-खोकला केवळ औषधोपचाराने बरा होऊ शकत नाही. त्याऐवजी खाण्याकडे लक्ष द्यावे लागेल. रेफ्रिजरेटेड पाणी, थंड पेय किंवा थंड अन्न खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे. त्याऐवजी तुमच्या आहारात गरम पदार्थ, फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

या हंगामात बाजारात विविध प्रकारच्या भाज्या मिळतात. त्यामुळे भाजी किंवा चिकन सूप तुम्ही घरी तयार करू शकता. सूपमध्ये तेल खूप कमी वापरा. त्यामुळे पचन लवकर होते. भाज्या आणि चिकन सूप नियमित बनवा आणि खा. यामुळे हिवाळ्याच्या हंगामात ही तुम्ही निरोगी राहाल.

-लसूण खाद्यपदार्थांमध्ये वापरला की कोणत्याही पदार्थाची चव बदलते. लसूण आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. लसणामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढण्यास मदत होते. कच्चा लसूण देखील वजन कमी करण्यास मदत करतो. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये लसणाचा समावेश करा.

-हिवाळ्यात विविध पालेभाज्या बाजारपेठेमध्ये मिळतात. ब्रोकोली ही भाजी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ब्रोकोली सूप, सलाड आवडेल ते खा. ब्रोकोलीमधील व्हिटॅमिन ई आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तसेच मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -