बँकेच्या पैशाच्या देवाणघेवाणीवर ऊन पोटच्या मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना बीड(Bid) जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पारनेर(Parner) गावात घटना घडली आहे. मुलाने बापाला जबर मारहाण करून त्याचा खून केला त्यानंतर दुसरा लहान भाऊ आणि तीन चुलताच्या मदतीने वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार पुरावा नष्ट केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दोन भाऊ व तीन चुलत्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. दारूच्या नशेत वडील महादेव (55) यांना त्यांच्या मोठ्या मुलगा योगेश महादेव औटेने (32) रात्री साडेनऊ वाजता घरासमोर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले त्यानंतर घरात झोपायला गेल्यावर झोपेमध्ये त्यांचा मृत्यू झाला.
योगेशने लहान भाऊ गणेश चुलते विष्णू बलभीम औटे, वाल्मिकी बलभीम औटे, परमेश्वर बलभीम औटे यांच्या मदतीने मध्यरात्री शेतात नेऊन वडिलांवर अंत्यसंस्कार करत पुरावे नष्ट केले.