Tuesday, September 26, 2023
Homenewsवाढदिवसाला बोलवून मित्रानेच केला मित्राचा खून...

वाढदिवसाला बोलवून मित्रानेच केला मित्राचा खून…

अंबाजोगाई(ambajogai) शहरात वाढदिवसाला बोलावून मित्रानेच खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहारातील खोलेश्वर प्राथमिक शाळे जवळील छल्ला भागात राहणारे वीटभट्टी चालक फारूक लतीफ मोमीन (42 रा, कोठाड गल्ली अंबाजोगाई) हे मागील दोन दिवसांपासून बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह भेटला आणि त्यांचा खून झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बर्दापुर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

मित्राने वाढदिवस आहे म्हणून पार्टी ला बोलावून घेतले आणि एका मित्राच्या मदतीने त्याचा खून केला असे पोलीस तपासात समजले आहे. मोमीन राजेश फारूक यांच्या फिर्यादीवरून वाघ्या साठे आणि अन्य एक अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृतदेह आढळताच बर्दापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली ठाणे प्रमुख एपीआय रवींद्र शिंदे यांनी पोलिसांचे एक पथक खुनाच्या तपात कामासाठी पाठविले अवघ्या 24 तासांतच पोलिसांनी मारुती उर्फ वाघ्या हनुमंत चाटे (रा.वरवटी ता.अंबाजोगाई)यास ताब्यात घेतले आहे.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र