पंढरपूरची आषाढी यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरला जात असतात. या भाविकांच्या सोयीसाठी बीड जिल्ह्यातील परळी एसटी बस आगाराकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विठुमाऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या आणि पंढरपूर यात्रेसाठी परळी आगारातून वारकऱ्यांसाठी 20 जादा बसेस धावणार आहेत. वारकऱ्यांच्या सेवेसाठी या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. परळी आगाराकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा फायदा होणार आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांमधून एसटी महामंडळाने असा निर्णय घेतला आहे. नांदेड परिवहन विभागात एकूण नऊ आगार आहेत. या नऊ अगारातून 230 बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.13 जुलै ते 22 जुलै पर्यंत या बसेस नांदेड ते पंढरपूर आशा धावणार आहेत. नांदेड परिवहन विभागाने तयारी पूर्ण केली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. एखाद्या गावातून 40 प्रवाशी मिळाल्यास त्या प्रवाशांसाठी देखील बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आषाढी यात्रेसाठी जाणाऱ्या ‘लालपरी’च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ आगाराकडून जादा बसेस
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -