Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रअंत्यसंस्कार करुन परतणाऱ्यांना ट्रकने चिरडलं, नगर-कल्याण महामार्गावर काळाचा घाला

अंत्यसंस्कार करुन परतणाऱ्यांना ट्रकने चिरडलं, नगर-कल्याण महामार्गावर काळाचा घाला

 

नगर-कल्याण महामार्गावर आळेफाटा येथे भीषण अपघात झाला आहे. महत्त्वाच म्हणजे अंत्यसंस्कार झाल्यानंतर हा भीषण अपघात घडला.

 

पुणे नगर-कल्याण महामार्गावर आळेफाटा येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रक रस्ता सोडून अंत्यविधीवरुन परतणाऱ्या लोकांमध्ये घुसला. या अपघातात पाच जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर 10 जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचा ही समावेश आहे. जुन्नर तालुक्यात गुळंचवाडी शिवारात ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी 11.30 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

 

नगरकडून भरधाव वेगात येणाऱ्या या ट्रकने महामार्गावरील आठ ते दहा वाहनांना धडक दिली. जखमींना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करत आहेत.

 

स्थानिक नागरिक झाले आक्रमक

 

भरधाव ट्रकने नागरिकांना चिरडल्यामुळे प्रचंड संतापाची भावना आहे. स्थानिकांनी या अपघाताबद्दल संताप व्यक्त करत आंदोलन सुरु केल्याची माहिती आहे. गावातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा अंत्यविधी आटोपून लोक परत येत होते. त्यावेळी हा अपघात घडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -